नियोजनाचा अभाव : कर्मचाºयांच्या संथ कामाचा वाहनचालकांना फटका टोलनाक्यावर वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:11 IST2017-11-12T23:55:24+5:302017-11-13T00:11:40+5:30
मुंबई-आग्रा महामार्गाचे इगतपुरी तालुक्यातील पडघा ते गोंदे या नव्वद किलोमीटर अंतराचे चौपदरीकरण झाल्यानंतर या रस्त्यावर घोटी येथे उभारण्यात आलेल्या पथकर नाक्यावर नियोजनाअभावी आणि कर्मचाºयांच्या संथ कारभारामुळे वाहतूक कोंडी होत आहे.

नियोजनाचा अभाव : कर्मचाºयांच्या संथ कामाचा वाहनचालकांना फटका टोलनाक्यावर वाहतूक कोंडी
घोटी : मुंबई-आग्रा महामार्गाचे इगतपुरी तालुक्यातील पडघा ते गोंदे या नव्वद किलोमीटर अंतराचे चौपदरीकरण झाल्यानंतर या रस्त्यावर घोटी येथे उभारण्यात आलेल्या पथकर नाक्यावर नियोजनाअभावी आणि कर्मचाºयांच्या संथ कारभारामुळे वाहतूक कोंडी होत आहे.
नाशिक आणि मुंबईकडे जाणाºया वाहनधारकांना तासन्तास वाहनांच्या रांगेत ताटकळत थांबावे लागत आहे. यामुळे चालकांनी संताप व्यक्त केला असून, याबाबत महामार्ग प्राधिकरणाने दखल घेऊन वाहतूक कोंडीची समस्या मार्गी लावावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.
मुंबई-आग्रा महामार्गाचे पडघे ते गोंदे दरम्यान विस्तारीकरण झाल्यानंतर घोटीजवळ पथकर नाका सुरू करण्यात आला आहे. आठ लेन असलेल्या या नाक्यावर आरंभीच्या काळात सुलभतेने टोल आकारणी करून कमी वेळेत आणि सोयीस्करपणे वाहने जात येत होती. मात्र अलीकडच्या काळात या रस्त्यावरील वाहतुकीची वर्दळ वाढल्याने व कर्मचारी संथपणे कामे करीत असल्याने टोलनाक्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहे. सुटीच्या दिवशी वाहनांची संख्या मोठी असल्याने तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. दरम्यान, नेहमीच होणाºया या प्रकारामुळे वाहनचालक त्रस्त झाले असून, मुंबई आणि नाशिकला जाणाºया प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. याबाबत महामार्ग प्राधिकरणाने लक्ष घालून नाशिक-मुंबई प्रवास सुखकर करावा, अशी मागणी चालक व प्रवाशांकडून होत आहे