टायरच्या गुदामास लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान
By Admin | Updated: May 1, 2017 01:32 IST2017-05-01T01:32:18+5:302017-05-01T01:32:32+5:30
इंदिरानगर : येथील शिवाजीवाडीसमोर असलेल्या टायरच्या गुदामास रविवारी (दि़३०) सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली़

टायरच्या गुदामास लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान
इंदिरानगर : येथील शिवाजीवाडीसमोर असलेल्या टायरच्या गुदामास रविवारी (दि़३०) सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली़ यामध्ये वाहनांचे जुने व नवे टायरचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याच्या अदांज वर्तविण्यात आला आहे़ अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच बंबांच्या साहाय्याने सुमारे एक तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविले़
शिवाजीवाडीसमोरील रहेनुमा शाळेला लागून जुन्या व नव्या टायरचे गुदाम आहे़ सांयकाळी सहा वाजेच्या सुमारास अचानक गुदामातून धूर येऊ लागला व क्षणार्धात टायरांनी पेट घेतला व आगीने रौद्र रूप धारण केले़ यामुळे आकाशात काळ्या धुराचे लोट दुरवरूनही दृष्टीस पडत होते़ सुमारे एक तासाच्या परिश्रमानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच बंबांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविले़