मनुष्यबळाचा अभाव : कचऱ्याचे साचले ढिगारे, देखभालीअभावी यंत्रणा नादुरुस्त,

By Admin | Updated: December 20, 2014 00:35 IST2014-12-20T00:18:21+5:302014-12-20T00:35:58+5:30

मोकाट जनावरांचा मुक्तसंचारखतप्रकल्प : कधी सुरू, कधी बंद

Lack of manpower: Debris of debris, defective mechanism due to lack of maintenance, | मनुष्यबळाचा अभाव : कचऱ्याचे साचले ढिगारे, देखभालीअभावी यंत्रणा नादुरुस्त,

मनुष्यबळाचा अभाव : कचऱ्याचे साचले ढिगारे, देखभालीअभावी यंत्रणा नादुरुस्त,

 नाशिक : त्र्यंबकेश्वरचा कचरा स्वीकारण्यापूर्वी खतप्रकल्प तरी पूर्ण क्षमतेने चालविला जातो आहे काय, असा सवाल गुरुवारी झालेल्या महासभेत सदस्यांनी उपस्थित केला होता. हाच प्रश्न घेऊन ‘लोकमत’ने खतप्रकल्पावर भेट देऊन कानोसा घेतला असता प्रकल्प बंद स्थितीत आढळून आला तर तेथे हजर असलेल्या कामगारांनी प्रकल्प कधी सुरू, कधी बंद असल्याचे सावधपणे उत्तर दिले. खतप्रकल्पावर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले असून, पोकलॅन, जेसीबीसह अनेक मशिनरी नादुरुस्त होऊन पडल्याचेही निदर्शनास आले. याशिवाय तयार खताच्या गोण्याही थप्पीला लागलेल्या दिसून आल्या.
त्र्यंबकेश्वरचा कचरा स्वीकारण्यापूर्वी आपला खतप्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविला जातो आहे किंवा नाही याचा जाब सदस्यांनी महासभेत प्रशासनाला विचारला होता. खतप्रकल्प हा कचरा डेपो बनला असून, कचऱ्याचे ढिगारे साचत असल्याने परिसरातील ग्रामस्थांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो आहे. ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’ अशी परिस्थिती आता त्र्यंबकेश्वरच्या कचऱ्यामुळे उद्भवणार असल्याने ग्रामस्थांनी आणखीणच धसका घेतला आहे. खतप्रकल्पावर दुपारच्या सुमारास पाहणी केली असता खतप्रकल्प बंद स्थितीत आढळून आला. तेथे हजर असलेल्या कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता, त्यांनी उत्तरे देणे टाळले. सदर मशीन नादुरुस्त असून, इंजिनिअरला दुरुस्तीसाठी बोलाविले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. खतप्रकल्पावर ठिकठिकाणी कचरा आढळून आला याशिवाय या कचऱ्यावर मोकाट जनावरांचा जथ्थाही ताव मारताना दिसून आला. खतप्रकल्पावर ठिकठिकाणी पोकलॅन, जेसीबी यासारखी कोट्यवधी रुपयांची मशिनरी धूळ खात पडून दिसून आली, तर काही मशिनरी नादुरुस्त होऊन पडलेली आढळून आली. खतप्रकल्पावर रोज कचऱ्यावर प्रक्रिया होऊन खतनिर्मिती होत असल्याचा आणि खताला लगेचच उठाव असल्याचा दावा प्रशासनाने केला; परंतु खतप्रकल्पावर खतांच्या गोण्यांच्या थप्प्या पाहायला मिळाल्या.

Web Title: Lack of manpower: Debris of debris, defective mechanism due to lack of maintenance,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.