खामखेड्यात शेतमजुरांची टंचाई

By Admin | Updated: October 2, 2014 00:35 IST2014-10-02T00:30:27+5:302014-10-02T00:35:47+5:30

खामखेड्यात शेतमजुरांची टंचाई

Lack of livelihood in Khamkhed | खामखेड्यात शेतमजुरांची टंचाई

खामखेड्यात शेतमजुरांची टंचाई


खामखेडा : परिसरात मजूर टंचाई जाणवत असून, परगावाहून आण्यात आलेले अनेक शेतमजूर शिवारामध्ये काम करताना दिसून येत आहेत. तरीही शेतमजुरांची कमतरता भासत आहे.
सध्या शेतीमध्ये कांदा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड सुरू आहे. चालु वर्षी उशिरा आलेल्या पावसामुळे बाजरी, मका पिकाची पेरणी उशिरा झाली.
सध्या पावसाळी कांद्याची लागवड सर्वत्र चालू आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची गरज भासू लागली आहे. पूर्वी गावामध्ये अगदी थोड्या शेतकऱ्यांकडे बागायती शेती होती. त्यामुळे गावातील मजुरांकडे शेतकामासाठी मजूर उपलब्ध होत असे. पूर्वी स्थानिक शेतमजूर कामे करीत. अशा लोकांनी स्वत:च्या शेतातच विहिरी खोदून पडित जमिनी बागायती केल्यामुळे त्यांनाच शेतमजुराची गरज भासू लागली आहे. स्थानिक मजुरांची संख्या कमी झाल्याने मोठ्या शेतकऱ्याला काही जमिनी निम्म्या वाट्याने द्यावी लागत आहे. काही मोठ्या शेतकऱ्यांनी मजुराअभावी जमिनी पडीत ठेवावी लागत आहे.
शेतकऱ्याला बाहेर गावाहून मजूर आणावे लागत आहेत. बाहेर गावाहून मजूर उशिराने येतात आणि परत लवकर शेतातून सोडावे लागते. त्यामुळे बाहेर गावाचे मजूर महागडे ठरतात. (वार्ताहर)

Web Title: Lack of livelihood in Khamkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.