कामगार कल्याण केंद्राचा स्लॅब कोसळला
By Admin | Updated: July 23, 2016 01:30 IST2016-07-23T01:30:28+5:302016-07-23T01:30:39+5:30
कामगार कल्याण केंद्राचा स्लॅब कोसळला

कामगार कल्याण केंद्राचा स्लॅब कोसळला
नाशिकरोड : देवळालीगाव यशवंत मंडईच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्राच्या छताचा स्लॅब काही प्रमाणात शुक्रवारी सकाळी कोसळल्याने विद्यार्थ्यांची धांदल उडाली होती. मनपाकडून स्वत:च्याच धोकेदायक इमारतीकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
देवळालीगाव येथे ५५ वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या एक मजली यशवंत मंडईमध्ये सध्या पहिल्या मजल्यावर महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्रामार्फत बालवाडी, अभ्यासिका, वाचनालय व विविध क्लास घेतले जातात. यशवंत मंडईच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅब ‘लोडबेरिंग’ पद्धतीने बनविण्यात आला असून, सध्या त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. पहिल्या मजल्याच्या स्लॅबमधून ठिकठिकाणी पावसाचे पाणी गळत असून, स्लॅबचे प्लास्टर निघाले आहे. त्यामुळे अत्यंत धोकेदायक परिस्थिती असून, मनपा व बांधकाम प्रशासनाला वारंवार
सांगून सुद्धा दुर्लक्ष केले जात
आहे. (प्रतिनिधी)