शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भरपूर निधी असूनही कामगार रुग्णालये दुर्लक्षित : कराड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 00:30 IST

अंधेरी येथील ईएसआयसी हॉस्पिटलला आग लागून मृत्युमुखी पडलेल्या १० रुग्णांना प्रत्येकी २५ लाख, तर उर्वरित जखमींना अर्थसहाय्य करावे, अशी मागणी सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी केली आहे.

सातपूर : अंधेरी येथील ईएसआयसी हॉस्पिटलला आग लागून मृत्युमुखी पडलेल्या १० रुग्णांना प्रत्येकी २५ लाख, तर उर्वरित जखमींना अर्थसहाय्य करावे, अशी मागणी सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी केली आहे. सीटूचे नारायण, डॉ. रवि मदने व गंगाधर वरड यांनी रुग्णालयाला भेट देऊन माहिती घेतल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.  अंधेरीच्या ईएसआयसी रुग्णालयाची इमारत १९७७ मध्ये बांधण्यात आली आहे. नव्या बिल्डिंगचे काम २००९ पासून सुरू आहे व अध्यापही पूर्ण झालेले नाही. याला केंद्रीय कामगारमंत्री, ईएसआयसीचे वरिष्ठ अधिकारी जबाबदार आहेत. हे बांधकाम वेळेत पूर्ण झाले असते तर जीवितहानी झाली नसती. २०१० मध्ये व नंतरही या हॉस्पिटलमध्ये स्लॅब पडणे, आग लागणे असे अपघात झाले आहेत, परंतु प्रशासनाने लक्ष दिले नाही.या हॉस्पिटलमध्ये आग आटोक्यात आणण्याची यंत्रणा का नव्हती? बीएमसीने रजिस्ट्रेशन कसे केले. याबाबतही चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक आहे. अशीच अवस्था नाशिक, औरंगाबाद व इतर हॉस्पिटलची आहे. त्याचा त्रास कामगार व जनतेला सहन करावा लागत आहे.सध्या ईएसआयसीकडे ७० हजार कोटीपेक्षा जास्त राखीव निधी पडून आहे. २०१७ मध्ये ईएसआयसीकडे १४ हजार कोटी रुपये जमा झालेत. त्यापैकी ७ हजार कोटीपेक्षा कमी रुपये वैद्यकीय सुविधांवर खर्च झाले. यावरून कामगारांचे उपचार व इतर लाभासाठी प्रचंड निधी असूनही सरकारला सक्षम यंत्रणा उभारता आली नाही. याला केंद्रीय मंत्री, राज्याचे मंत्री जबाबदार आहेत, असा आरोप डॉ. कराड यांनी केला आहे.गुन्हा दाखल करावाआगीची घटना व दहा रुग्णांचा मृत्यू का झाला याची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी. ईएसआयसीच्या सर्व रुग्णालयांचे फायर आॅडिट करण्यात यावे. ईएसआयसी रुग्णालयात डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची भरती करावी व सर्व रोगांवरील उपचाराची अद्ययावत यंत्रणा सुविधांसह उपलब्ध करण्यात यावी, या मागण्या करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Employeeकर्मचारीhospitalहॉस्पिटलNashikनाशिक