मजुरांचे कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 10:12 PM2020-05-03T22:12:31+5:302020-05-03T22:13:49+5:30

सिन्नर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग टप्पा क्रमांक १२ अंतर्गत काम करणाऱ्या दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या ट्रकचालक आणि मशीन आॅपरेटर यांनी रविवारी तालुक्यातील वावी येथील कॅम्पसमध्ये कामबंद आंदोलन पुकारले. आम्हाला आमचा पगार द्या आणि गावाकडे सुखरूप पाठवा, अशी मागणी करत या कामगारांनी कंपनी प्रशासनाकडून होत असलेल्या दडपशाहीचा निषेधही केला.

Labor strike | मजुरांचे कामबंद आंदोलन

वावी येथील कॅम्पसमध्ये ट्रक व इतर वाहने उभी करून देत समृद्धी महामार्गाच्या कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारले.

Next
ठळक मुद्देसमृद्धी महामार्ग : परप्रांतीय ट्रक ड्रायव्हर, आॅपरेटर, कामगार घरी परतण्यासाठी अस्वस्थ

लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग टप्पा क्रमांक १२ अंतर्गत काम करणाऱ्या दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या ट्रकचालक आणि मशीन आॅपरेटर यांनी रविवारी तालुक्यातील वावी येथील कॅम्पसमध्ये कामबंद आंदोलन पुकारले. आम्हाला आमचा पगार द्या आणि गावाकडे सुखरूप पाठवा, अशी मागणी करत या कामगारांनी कंपनी प्रशासनाकडून होत असलेल्या दडपशाहीचा निषेधही केला.
समृद्धी महामार्गाच्या कामासाठी वावी येथे साडेपाचशे लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी असणाºया ट्रकचालक आणि मशीन आॅपरेटर यांच्याकडून व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दडपशाहीचा निषेध करण्यात आला. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आम्हाला जाणीवपूर्वक त्रास देतात. खाण्यापिण्याच्या सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याने आम्हाला नेहमीच वावी गावात जावे लागते. मात्र, कोरोना संसर्गाच्या भीतीने गावातील जाणेही समृद्धी महामार्ग : परप्रांतीय ट्रक ड्रायव्हर, आॅपरेटर, कामगार घरी परतण्यासाठी अस्वस्थ मजुरांचे कामबंद आंदोलनधोक्याचे ठरते. शिवाय संचारबंदी आदेशाचा भंग केला म्हणून वारंवार पोलीस ठाण्यातही जावे लागते. असे असताना कंपनी प्रशासन मात्र सुविधा उपलब्ध करून देण्याऐवजी त्रास देत असल्याचा आरोप या कामगारांनी केला आहे. आम्हाला घराची ओढ लागली आहे.
कोरोनामुळे संपूर्ण देश संकटात असल्याने साहजिकच आमचे कुटुंबीयदेखील काळजीत आहेत. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने आमचे पगार व थकीत देऊन आमची गावाकडे परत जाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली. कंपनीकडून अशी व्यवस्था होत नसेल तर प्रशासकीय यंत्रणांनी लक्ष घालावे व आम्हाला सुखरूप गावाकडे पोहोचवावे, अशी मागणी करत सकाळपासूनच कॅम्पसच्या आवारात हे कामगार एकत्र येऊन व्यवस्थापनाच्या विरोधात घोषणा देत होते. त्यामुळे वावी कॅम्पसमधून आज एकही वाहन बाहेर पडले नसल्याचे या कामगारांनी सांगितले. आमच्या अडचणींची सोडवणूक होत नाही तोपर्यंत कंपनी विरोधात असहकार पुकारण्यात येईल अशी भूमिका कामगारांनी घेतली आहे.

नियम न मोडण्याचे आवाहन

कामगारांकडून सुरू असलेल्या या गोंधळाची माहिती मिळाल्यावर पोलीस उपनिरीक्षक अभय ढाकणे, हवालदार संदीप शिंदे यांनी कॅम्पसमध्ये धाव घेतली. कर्मचाºयांनी कोरोनासंदर्भात देण्यात आलेल्या शासनाच्या आदेशाचे पालन करावे. कुठल्याही परिस्थितीत एकत्र येऊन नियम मोडू नये असे आवाहन ढाकणे यांनी केले.

कामगारांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात येणार

कामगारांच्या मागण्यांसंदर्भात सहायक निरीक्षक रणजित गलांडे यांच्यामार्फत कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करण्यात येईल. कामगारांची मागणी योग्य असली तरी कायदेशीर सोपस्कार पार पाडूनच कामगारांची गावाकडे जाण्याची व्यवस्था करता येईल. याकडे लक्ष वेधत कुणीही कामगाराने नियम मोडू नये असे आवाहन ढाकणे यांनी केले. मात्र, कोणत्याही परिस्थितीत काम सुरू करणार नाही असा पवित्रा घेत कंपनी व्यवस्थापनाच्या मुस्कटदाबीला आता आम्ही बळी पडणार नाही असे या कामगारांनी सांगितले.


 

 

Web Title: Labor strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.