मजूर परतले, पाऊसही थांबल्याने कामाला ‘समृद्धी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 01:17 IST2020-10-05T23:17:44+5:302020-10-06T01:17:29+5:30
नाशिक: पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी तालुक्यातील जोरदार पाऊस आणि कोरोनामुळे गावाकडे परतलेले मजूर यामुळे समृध्दी महामर्गाच्या इगतपुरी येथील थांबलेले कामकाज आता पुन्हा सुरू झाले आहे. पुढील महिन्यापासून कामाला अधिक गती येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

मजूर परतले, पाऊसही थांबल्याने कामाला ‘समृद्धी’
नाशिक: पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी तालुक्यातील जोरदार पाऊस आणि कोरोनामुळे गावाकडे परतलेले मजूर यामुळे समृध्दी महामर्गाच्या इगतपुरी येथील थांबलेले कामकाज आता पुन्हा सुरू झाले आहे. पुढील महिन्यापासून कामाला अधिक गती येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
नाशिक जिल्'ातील सिन्नर आणि इगतपुरीतून जाणाऱ्या समृद्धी महामार्गासाठी जवळपास भुसंपादन पुर्ण करण्यात आले असून उर्वरित भुसंपदानाची प्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्यांशाी चर्चा केली जात आहे. भुसंपादनाची कोणतीही अडचण नसून शेतकरी देखील सहकार्य करीत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. ज्या ठिकाणी काम सुरू आहे अशा ठिकाच्या कामाला वेग येऊ लागला आहे. सिन्नरमधून जाणाºया मार्गाचे बºयापैकी काम झाले आहे. सुमारे ३७ ते ३८ टक्के कामकाज झालेले आहे. इगतपुरी मधून जाणाºया मार्गावर असलेले दोन पूल तसेच भुयारी मार्ग यामुळे येथील कामाला प्राधान्य दिले जात आहे.
पावसाळ्यात इगतपुरीत पावसाचा जोर असल्यामुळे कामकाजाला अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे आठे ते दहा दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी काम बंद करण्याची नामुष्की ओढावली होती. अनेकदा पावसामुळे कामकाजात खंड येत असतांनाच कोरानाच्या फटका या कामाला बसला. या कामावरील मजूर गावी परतल्याने कामावºया बºयापैकी परिणाम झाला. उरलेल्या मनुष्यबळावर काम सुरू ठेवºयात आले होते. त्यातही अधून मधून पावसाचा फटका हा बसत होता.
आता मात्र परिस्थितीत मोठा बदल झाला असून कामकाजाला गती आलेली आहे. गावी गेलेले मजूर बºयापैकी कामावर परतले आहेत तर पावसाचा जोर देखील कमी झाल्याने कामकाज सुरळीत सुरू झाले आहे. पाऊस परतलीला लागल्यामुळे कामकाजात अधिक गतीमानता येईल असे देखील जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
नाशिक जिल्'ात या कामाचे तीन टप्पे आहेत. पावसामुळे या कामावर काहीसा परिणाम झाला. पावसामुळे कामे संथ गतीने सुरू होती तर नंतरच्या काळात मजुरांचा तुटवडा निर्माण झाला. मजूरांची संख्या कमी असली तरी पावसाळ्यात देखील असलेल्या मनुष्यबळावर कामकाज सुरू ठेवण्यात आले होते. या कामांसाठी मंजुर झालेल्या निधीनुसार या कामकाज झालेले आहे. टप्पा १३ आणि १४ साठी मिळालेल्या निधीनुूसार कामकाज २० टक्केच्या पुढे गेलेले आहे तर सिन्नर मधील कामकाज हे ३७ टक्के झालेले आहे. निधीचा पुढचा टप्पा लवकरच प्राप्त होणार असल्याने कामकाला गती दिली जाणार आहे