शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

प्रेस निवडणुकीत कामगार पॅनलचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:08 IST

भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालयातील मजदूर संघाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत कामगार पॅनलने सर्व २९ जागांवर विजय संपादित करून निर्विवाद वर्चस्व प्रस्तापित केले आहे. आपला पॅनलचा साफ धुव्वा उडाला आहे.

नाशिकरोड : भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालयातील मजदूर संघाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत कामगार पॅनलने सर्व २९ जागांवर विजय संपादित करून निर्विवाद वर्चस्व प्रस्तापित केले आहे. आपला पॅनलचा साफ धुव्वा उडाला आहे. भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणाल-यातील मजदूर संघाच्या अध्यक्षपदी हिंद मजदूर सभेचे राष्टÑीय खजिनदार जे. आर. भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे. मजदूर संघाच्या १३ पदाधिकारी व १६ कार्यकारिणी सदस्य अशा २९ जागांसाठी शनिवारी ९५ टक्के मतदान झाले होते. रविवारी सकाळी आयएसपी रेस्ट हेड येथे मतमोजणीस प्रारंभ झाला. मतमोजणीमध्ये पहिल्यापासून कामगार पॅनलच्या सर्व उमेदवारांनी आघाडी मिळवली होती. मध्यरात्री बाद मतपत्रिकेवर हरकत घेण्यात आल्याने पहाटे ३ वाजता मत मोजणीचा निकाल लागला.उमेदवारांना मिळालेली मतेमजदूर संघ सरचिटणीस जगदीश गोडसे (१९८७), कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे (२१००), उपाध्यक्ष ४ जागा - सुनील आहिरे (१९०१), दिनकर खर्जुल (१७०९), राजेश टाकेकर (१९३२), केरू पाळदे (१६४५), जॉर्इंट सेक्रेटरी ६ जागा - शिवाजी कदम (१८०१), जयराम कोठुळे (१७६३), रमेश खुळे (१७४८), कार्तिक डांगे (१७७७), उल्हास भालेराव (१५८७), इरफान शेख (१६३३), खजिनदार - उत्तम रकिबे (१८१३), कार्यकारिणी सदस्य १६ जागा - शरद अरिंगळे (१८२४), सुरेश आढाव (१८२५), अरुण गिते (१८४२), संजय गुंजाळ (१६५०), संपत घुगे (१७८८), सुदाम चौरे (१७०३), प्रकाश जगताप (१६४९), राजू जगताप (१६६४), कचरू ताजनपुरे (१७५६), संतोष ताजनपुरे (१६६६), अनिल थोरात (१६८०), अविनाश देवरूखकर (१७४८), भगवान बिडवे (१६५८), अरुण भोळे (१५६१), संदीप व्यवहारे (१७०२), मनोज सोनवणे (१६६९) मते मिळवुन विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माधवराव भणगे यांनी काम पाहिले.जोरदार आनंदोत्सवमजदूर संघाच्या निवडणुकीत कामगार पॅनलने निर्विवाद विजय मिळवत असल्याचे चित्र स्पष्ट होताच रविवारी सायंकाळपासून पॅनलच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून, फटाके फोडून जोरदार आनंदोत्सव साजरा केला.पॅनलची ताकद वाढलीगेल्या निवडणुकीपेक्षा यंदा पॅनलला जास्त मते मिळाले असून, ताकद वाढल्याचे निकालातून दिसत आहे. प्रेसच्या निवडणुकीत पहिल्यांदाच पैशाचा वापर करण्यात आला. गेल्या ईपीएफ निवडणुकीपासून सत्ताधाºयांनीच कामगार चळवळीत राजकीय प्रतिनिधींना आणले.  - रामभाऊ जगताप,  आपला पॅनलकामाची पावतीगेल्या सहा वर्षांपासून कामगारांच्या हिताचे घेतलेल्या निर्णयाची पावती कामगारांनी लोकशाही पद्धतीने दिली. प्रतिस्पर्ध्यांनी प्रेसच्या इतिहासात पहिल्यांदाच राजकीय पक्षाचे राजकारण आणले. मात्र कामगारांनी कामगार चळवळीप्रमाणेच उत्तर दिले.  - जगदीश गोडसे,कामगार पॅनल

टॅग्स :Nashikनाशिक