शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

वडझिरे येथे सेलिब्रेटीसह ३ हजार जलमित्रांचे श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 18:23 IST

सिन्नर तालुक्यातील वडझिरे येथे पानी फाऊंडेशनच्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेला महाराष्टÑ दिनी आयोजित महाश्रमदानास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक सेलिब्रेटीसह ३ हजार जलमित्रांनी वडझिरे येथे येऊन श्रमदानात सक्रीय सहभाग नोंदविला.

ठळक मुद्देतुफान आलंयाऽऽ : पानी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

वडझिरे : सिन्नर तालुक्यातील वडझिरे येथे पानी फाऊंडेशनच्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेला महाराष्टÑ दिनी आयोजित महाश्रमदानास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक सेलिब्रेटीसह ३ हजार जलमित्रांनी वडझिरे येथे येऊन श्रमदानात सक्रीय सहभाग नोंदविला. यामुळे वडझिरेकरांच्या उत्साहात भर पडली. या महाश्रमदानासाठी मुंबई, पुणे आदी शहरांसह परदेशातून आलेल्या स्वयंसेवकांनी श्रमदान केले.पानी फाउंडेशनचे सीओ तसेच लगान चित्रपटाटाचे दिग्दर्शक सत्यजित भटकळ, माझ्या नवऱ्याची बायको फेम (राधिका) अनिता दाते, जशराज जोशी, लोकप्रिय गायक श्रानंदी जोशी, कोकण विभाग जीवन प्राधिकरण विभागाच्या मुख्य अभियंता मनिषा पलांडे, टाटा पॉवर मुंबईचे कर्मचारी एस. एस. के. पकोड स्कूलचे विद्यार्थी, शिक्षक, वडझिरे जिल्हा परिषद शेळेचे विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक आदींसह अनेक स्वयंसेवी संस्था, कर्मचारी व अधिकारी महाश्रमदानासाठी उपस्थित होते.गतवर्षी वडझिरे गावात महाश्रमदान आयोजित केले होते. त्यावेळी ग्रामस्थांचा प्रतिसाद बघता रात्रंदिवस मेहनत घेवून पानी फाउंडेशन टीम व ग्रामस्थांनी ग्रामस्थांनी महाश्रमदानाची तयारी केली. सत्यजित भटकळ व अनिता दातेसह मनिषा पलांडे यांनी वडझिरे गावात श्रमदानासाठी आल्यावर ग्रामस्थांचा प्रतिसाद बघता ग्रामस्थांचे कौतुक केले.महाराष्टÑ दुष्काळात होरपळत असताना शासनाच्या कुठल्याही आर्थिक मदतीशिवाय पानी फाउंडेशनचे काम काही गावांमध्ये जोमाने सुरू आहे. यामुळे ग्रामस्थांना पाण्याचे महत्व समजले असून पाणी कोण देणार तर मी देणार अशा दुष्काळाशी दोन हात करण्यास अनेक सेलिब्रेटी, छोट्यामुलांसह जलमित्र श्रमदानासाठी उपस्थित झाले होते. सलग तीन दिवस सुट्या असल्याने कुठलीही पिकनिक न करता आपल्याला जो अन्न पिकवतो त्या शेतकरी राजाला पाण्याला अन्न पिकवण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. ते मिळवून देण्यासाठी अनेक जलमित्र श्रमदानासाठी पुढे सरसावले होते. वडझिरे ग्रामपंचायतीच्या वतीने जलमित्रांना साहित्य, पिण्याचे पाणी व अल्पाहाराची व्यवस्था करण्यात आली होती. नायगाव येथील वैद्यकीय विभागाने जलमित्रांच्या सेवेसाठी मदत केली. या महाश्रमदानात नववधू म्हणून बोहल्यावर उभी राहण्याआधी वैशाली भाऊसाहेब बोडके परिवारासह महाश्रमदानात सहभाग घेतला.पानी फाउंडेशनच्या वतीने सत्यजित भटकळ व अनिता दाते यांच्या हस्ते बोडके हिचा वृक्षाची हुंडी देवून सत्कार करण्यात आला. महाश्रमदान यशस्वीतेसाठी सरपंच शोभा बोडके, उपसरपंच छाया नागरे, ग्रामपंचायत सदस्य संजय नागरे, तुषार आंबेकर, अलका बोडके, रेखा बोडके, मंदा ठोंबर, ग्रामसेवक पांडुरंग सोळंके, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन बोडके, आर. बी. बोडके, विलास बोडके, भिमराव दराडे, मनोहर बोडके, अप्पा दराडे, वसंत बोडके, गंगा बोडके, सोमनाथ बोडके, विश्वनाथ बोडके, अशोक बोडके, नारायण क्षीरसागर, देविदास कुटे, संदीप आंबेकर, राहुल चव्हाण आदींसह मुख्याध्यापक महिला, विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांनी सहकार्य केले.४यात ३ हजार जलमित्रांनी श्रमदानासाठी आॅनलाईन रजिट्रेशन करून श्रमदान केले. वडझिरे गावातील ८०० जलमित्रांनी या महाश्रमदानात आपला खारीचा वाटा उचलला. महाश्रमदानासाठी आलेल्या काही जलमित्रांनी पानी फांऊडेशनच्या कामासाठी आर्थिक मदत केली.

टॅग्स :NashikनाशिकWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा