शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

औद्योगिक, व्यावसायिक ग्राहकांना केव्हीएएच बिलिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 01:27 IST

महावितरण कंपनीने औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना दि.१ एप्रिलपासून केडब्ल्यूएच बिलिंगऐवजी केव्हीएएच बिलिंग प्रणाली अमलात आणण्याचे निश्चित केले असून, ग्राहकांनी या प्रणालीनुसार आवश्यक ते बदल करून घ्यावेत, असे आवाहन महावितरणचे वाणिज्य संचालक सतीश चव्हाण यांनी केले.

सातपूर : महावितरण कंपनीने औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना दि.१ एप्रिलपासून केडब्ल्यूएच बिलिंगऐवजी केव्हीएएच बिलिंग प्रणाली अमलात आणण्याचे निश्चित केले असून, ग्राहकांनी या प्रणालीनुसार आवश्यक ते बदल करून घ्यावेत, असे आवाहन महावितरणचे वाणिज्य संचालक सतीश चव्हाण यांनी केले.सातपूर येथील नाईस सभागृहात केव्हीएएच बिलिंग प्रणाली या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. चव्हाण यांनी पुढे सांगितले की, दि. १२ सप्टेंबर २०१८ पासून वीज नियामक आयोगाच्या सूचनेनुसार औद्योगिक बिलात बदल करून पॉवर फॅक्टरमध्ये दंड व सवलत दिली होती. त्यामुळे ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात वादविवाद होत असल्याने वीज नियामक आयोगाने जानेवारीत आदेश काढून दि.१ एप्रिल २०१८ पासून वीज बिलातून पॉवर फॅक्टर काढून नवीन केव्हीएएच प्रणालीचा अवलंब करण्याचे निर्देश दिलेत. त्यानुसार दि. १ एप्रिल २०२० पासून ही प्रणाली अमलात येणार आहे. या नवीन प्रणालीची २० किलोवॅटपेक्षा अधिक विद्युतभार असलेल्या सर्व उच्चदाब आणि लघुदाब ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यासाठी महावितरणकडून ठिकठिकाणी चर्चासत्रांचे आयोजन केले जात आहे.या प्रणालीविषयी निमाचे माजी अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर, महाराष्ट्र चेंबर ऊर्जा समितीचे मिलिंद राजपूत, निमा ऊर्जा समितीचे रावसाहेब रकिबे, बबनराव चौरे, व्यंकटेश मूर्ती, रमेश पवार, निवृत्ती गांगुर्डे आदींसह उपस्थित ग्राहकांनी आपल्या शंकांचे निरसन करून घेतले, तर काही ग्राहकांनी सूचनादेखील केल्यात. यावेळी व्यासपीठावर मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर, अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली आदी उपस्थित होते. कार्यकारी अभियंता एस.सवइराम यांनी आभार मानले. यावेळी निमा, आयमा, महाराष्ट्र चेंबर, नाईस आदींसह विविध कारखान्यांतील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीज