लोकहितवादी मंडळाच्या वतीने ‘कुसुमाग्रज’ स्मरण

By Admin | Updated: March 9, 2015 01:24 IST2015-03-09T01:24:48+5:302015-03-09T01:24:49+5:30

लोकहितवादी मंडळाच्या वतीने ‘कुसुमाग्रज’ स्मरण

'Kusumagraj' remembrance on behalf of Lokhitvam Mandal | लोकहितवादी मंडळाच्या वतीने ‘कुसुमाग्रज’ स्मरण

लोकहितवादी मंडळाच्या वतीने ‘कुसुमाग्रज’ स्मरण

नाशिक : लोकहितवादी मंडळाच्या वतीने ‘कुसुमाग्रज’ स्मरण उपक्रमांतर्गत आयोजित बालकवी संमेलनात उपस्थित बालकवींनी विविध विषयांना स्पर्श करत आपल्या प्रतिभेचे दर्शन घडविले. दरम्यान, बालकवी संमेलनात छोट्या गटात जनता विद्यालयाच्या चैताली साळवे हिने, तर मोठ्या गटात यशोदामाता जयाभाई बिटको गर्ल्स हायस्कूलच्या रोहिणी काळे हिने प्रथम क्रमांक मिळविला. ज्योतिकलश सभागृहात आयोजित बालकवी संमेलनाचे उद्घाटन लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांच्या हस्ते झाले. यावेळी दिलीप साळवेकर, मुकुंद कुलकर्णी, सुभाष पाटील, विवेक वानवलकर आदि उपस्थित होते. संमेलनात छोट्या गटात द्वितीय क्रमांक श्रावणी बयाणी (आदर्श विद्यालय), तृतीय- अपेक्षा देशमुख (आदर्श विद्यालय), उत्तेजनार्थ- मंदार जोशी (भोसला स्कूल) आणि हेरंब पाटील (आदर्श विद्यालय), तर मोठ्या गटात द्वितीय- रितेश कुलकर्णी (पेठे विद्यालय), तृतीय- श्लोक खेर्डेकर (पेठे विद्यालय), उत्तेजनार्थ- शैलेश कंकरेज (एचएएल हायस्कूल) आणि गौरी सूर्यवंशी (पेठे विद्यालय) यांनी रोख पारितोषिके मिळविली. परीक्षक म्हणून पराग वाड आणि भक्ती आठवले यांनी काम पाहिले. पारितोषिकांचे वितरण मुकुंद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. परीक्षक पराग वाड यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेचे संयोजन मंडळाचे सचिव नवीन तांबट यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: 'Kusumagraj' remembrance on behalf of Lokhitvam Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.