कुंदेवाडी सोसायटी अध्यक्षपदाची सभा तहकूब

By Admin | Updated: July 30, 2016 23:28 IST2016-07-30T23:21:50+5:302016-07-30T23:28:46+5:30

कुंदेवाडी सोसायटी अध्यक्षपदाची सभा तहकूब

Kundewadi Society presided over the presidential meeting | कुंदेवाडी सोसायटी अध्यक्षपदाची सभा तहकूब

कुंदेवाडी सोसायटी अध्यक्षपदाची सभा तहकूब


सिन्नर : तालुक्यातील कुंदेवाडी येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेची अध्यक्षपदाच्या निवडीची विशेष सभा गणपूर्तीअभावी दुसऱ्यांदा तहकूब करण्यात आली.
कुंदेवाडी विकास संस्थेची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. संस्थेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची विशेष सभा शुक्रवारी बोलविण्यात आली होती. यापूर्वी १८ तारखेला बोलविण्यात आलेली सभा गणपूर्तीअभावीच तहकूब करण्यात आली होती. शुक्रवारी बोलविण्यात आलेल्या सभेलाही गणपूर्ती झाली नाही. सभेला सात संचालकांची आवश्यकता होती. (वार्ताहर)

Web Title: Kundewadi Society presided over the presidential meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.