नाशिककरांनी पुन्हा अनुभवला कुंभमेळा

By Admin | Updated: November 1, 2015 22:06 IST2015-11-01T22:05:49+5:302015-11-01T22:06:55+5:30

अमृतकुंभ : वृत्तपत्र छायाचित्रकारांचे प्रदर्शन

Kumbh Mela again experienced Kumbh Mela again | नाशिककरांनी पुन्हा अनुभवला कुंभमेळा

नाशिककरांनी पुन्हा अनुभवला कुंभमेळा

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथे शैव साधूंचा जल्लोष, तर नाशिकनगरीत अनुभवयास आलेला वैष्णवांचा मेळा... साधूंच्या शाही मिरवणुका व स्नान... आश्चर्यचकित करणाऱ्या साधूंच्या साधना... गोदाकाठी स्नानासाठी लोटलेला भाविकांचा सागर... वरुणराजाच्या साक्षीने पार पडलेली अखेरची पर्वणी... अशा संस्मरणीय घटनांचा पुन:प्रत्यय नाशिककरांनी अनुभवला.
निमित्त होते वृत्तपत्र छायाचित्रकारांनी कुंभमेळ्यात काढलेल्या छायाचित्रांच्या ‘अमृतकुंभ’ प्रदर्शनाचे. चांदशी शिवारातील हॉटेल ‘ओवारा’ येथे आज (दि.१) अभिनेते चिन्मय उद्गिरकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. नाशिक प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशनच्या वतीने सदर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटनप्रसंगी ओवाराचे संचालक गिरीश पोद्दार, सुनील धोपावकर, छायाचित्रकार प्रसाद पवार आदिंची उपस्थिती होती.
नाशिकच्या वृत्तपत्र छायाचित्रकारांची कलेवरची हुकूमत, तंत्रावरचे प्रभुत्व पाहून अचंबित व्हायला होते, असे गौरवोद्गार चिन्मयने यावेळी काढले. सदर प्रदर्शन हे येत्या मंगळवारपर्यंत (दि.३) सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत सर्वांना पाहण्यासाठी खुले राहणार आहे. प्रदर्शनामध्ये शहरातील सुमारे वीस वृत्तपत्र छायाचित्रकारांनी काढलेल्या ऐंशी छायाचित्रांच्या समावेश असून, त्याद्वारे नागरिकांना सिंहस्थ कुं भमेळा पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. दरम्यान, आज पहिल्याच दिवशी नागरिकांचा प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळपासून नागरिकांनी छायाचित्र बघण्यासाठी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Kumbh Mela again experienced Kumbh Mela again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.