शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

कु-हेगावने अनाथ मुलांसाठी पुढे केला एक हात मदतीचा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 16:46 IST

कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूपासून काळजी घेण्यासाठी शासनाकडून विविध उपक्र म राबवून जनतेला काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत असून ठिकठिकाणी जनजागृती व मदतकार्यही सुरू आहे. लॉकडाऊनमुळे बाहेर पडता न येत असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील कु-हेगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करत संपूर्ण गावातून धान्य जमा करून ते धान्य त्र्यंबकेश्वर येथील आधार आश्रमातील अनाथ मुलांना व साकूर फाटा येथील मुकबधीर संस्थेतील मुलांना वाटप करण्यात आले.

ठळक मुद्दे आदर्श उपक्रम : गावातून संकलित केलेले धान्य वाटप

नांदूरवैद्य : कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूपासून काळजी घेण्यासाठी शासनाकडून विविध उपक्र म राबवून जनतेला काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत असून ठिकठिकाणी जनजागृती व मदतकार्यही सुरू आहे. लॉकडाऊनमुळे बाहेर पडता न येत असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील कु-हेगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करत संपूर्ण गावातून धान्य जमा करून ते धान्य त्र्यंबकेश्वर येथील आधार आश्रमातील अनाथ मुलांना व साकूर फाटा येथील मुकबधीर संस्थेतील मुलांना वाटप करण्यात आले.कोरोनाच्या लॉकडाउनमुळे अनेक गरीब, अनाथ मुलांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी इगतपुरी तालुक्यातील कु-हेगाव येथील ग्रामस्थांनी एकत्र येत त्यांच्यासाठी एक हात मदतीचा पुढे केला. संपूर्ण गावातून १०० ते १५० किलो तांदूळ जमा करून सदर धान्य त्र्यंबकेश्वर येथील आधार आश्रमातील अनाथ व गरीब मुलांना वाटप करत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यातील काही धान्य इगतपुरी तालुक्यातील साकुर फाटा येथे असलेल्या मुकबधीर संस्थेतील मुलांना वाटप केले आहे. कु-हेगाव ग्रामस्थांनी सदर धान्य वाटप करत असतांना सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करीत अनाथ आश्रमातील मुलांना हात वारंवार स्वच्छ धुवावेत, मास्क लावून विशेष काळजी घ्यावी तसेच उघडे अन्न खाऊ नये याविषयी जनजागृती केली.याप्रसंगी शिवसेनेचे शाखाप्रमुख अंबादास धोंगडे, पोलिस पाटील ज्ञानेश्वर धोंगडे, भाऊसाहेब तांबे, रामदास गायकवाड, शिवाजी धोगडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक