बीडकर करंडकावर ‘केटीएचएम’ची मोहोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:04 IST2020-02-07T22:39:09+5:302020-02-08T00:04:10+5:30
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित दादासाहेब बीडकर महाविद्यालयात बाराव्या दादासाहेब बीडकर स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या. या िनाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या गायत्री वडघुले हिने प्रथम क्र मांक मिळवला.

पेठ येथे दादासाहेब बीडकर महाविद्यालयात आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी हेमलता बीडकर, मनीषा क्षेमकल्याणी, अनंत क्षेमकल्याणी, शिवराज आनंदकर, डॉ. रघुनाथ टोचे, डॉ. नरेंद्र पाटील आदी.
पेठ : डांग सेवा मंडळ नाशिक संचलित दादासाहेब बीडकर महाविद्यालयात बाराव्या दादासाहेब बीडकर स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या. या िनाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या गायत्री वडघुले हिने प्रथम क्र मांक मिळवला.
संस्थेच्या अध्यक्ष हेमलता बीडकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांशी संलग्न असलेल्या धुळे, जळगाव, नगर, पुणे, औरंगाबाद आदी विविध महाविद्यालयांतून सुमारे ४० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. सर्व विजेते व सहभागी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. परीक्षक म्हणून मनीषा क्षेमकल्याणी, शिवराज आनंदकर, अनंत क्षेमकल्याणी, प्राचार्य डॉ. आर.बी. टोचे उपस्थित होते. प्रा. प्रतिभा शिरसाठ यांनी सूत्रसंचालन केले. आभार संयोजक प्रा. डॉ. नरेंद्र पाटील यांनी मानले.
विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे
प्रथम पारितोषिक - गायत्री वडघुले (केटीएचएम महाविद्यालय, नाशिक), द्वितीय पारितोषिक-तेजस्विनी नाथराव केंद्रे (शिवछत्रपती महाविद्यालय, सिडको, औरंगाबाद), तृतीय पारितोषिक -निखिल नगरकर (न्यू आर्ट्स, कॉमर्स कॉलेज, अहमदनगर), उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक -प्रतिभा पाटील (प्रताप महाविद्यालय, अमळनेर), उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक -दीपिका पाटील (प्रताप महाविद्यालय, अमळनेर)