शिवडी सोसायटीच्या सभापतिपदी क्षीरसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 00:35 IST2020-07-03T22:34:57+5:302020-07-04T00:35:37+5:30
काकासाहेबनगर : निफाड तालुक्यातील शिवडी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या सभापतिपदी कैलास रामनाथ क्षीरसागर तर उपसभापती मारुती त्र्यंबक कातकाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

शिवडी सहकारी संस्थेच्या सभापतीपदी कैलास क्षिरसागर तर उपसभापती मारु ती कातकाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी उपस्थित जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, संचालक बाळासाहेब सानप, भगीरथ शिंदे, भिकाजी क्षिरसागर आदी.
काकासाहेबनगर : निफाड तालुक्यातील शिवडी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या सभापतिपदी कैलास रामनाथ क्षीरसागर तर उपसभापती मारुती त्र्यंबक कातकाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आर. एस. ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली. जि. प. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, संचालक बाळासाहेब सानप, भगीरथ शिंदे, भिकाजी क्षीरसागर आदी उपस्थित होते.