नाशिक : मिर्झीया या हिंदी चित्रपटात पदार्पणातच पुरस्कार पटकावणारी आणि दक्षिणेतील चित्रपटातही अभिनयाची छाप पाडणारी नाशिकची कन्या संयमी खेर हिला आता रितेश देशमुख यांच्या आगामी माउली चित्रपटात नायिकेची भूमिका मिळाली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असून, जानेवारी महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.अभिनेता रितेश देशमुख याचा गाजलेला लई भारी चित्रपट चर्चेत ठरला होता त्याचा सिक्वल आता माउली नावाने येत आहे. त्यात संयमीला संधी मिळाली आहे. मराठमोळी आणि नाशिककर असलेल्या संयमीचा हा मराठीतील पहिलाच चित्रपट आहे. मराठी असतानाही तिने सर्वप्रथम दाक्षिणात्य चित्रपटात काम केले. वायव्हीएस चौधरी यांनी दिग्दर्शित केलेला तेलगू चित्रपट ‘रे’ मध्ये तिने दक्षिणेतील स्टार अभिनेता चिरंजिवीच्या भाच्याबरोबर म्हणजेच साई धरम तेज याच्याबरोबर काम केले होते. त्यानंतर मिर्झीयाद्वारे तिने बॉलिवूडमधील पहिला चित्रपट केला. याच चित्रपटासाठी तिला पदार्पणातील कामगिरीबद्दलचा दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळाला होता. त्याचबरोबर बेस्ट डेब्यू, फिल्मफेअरचा ग्लॅमर तसेच स्टाईल डेब्यू असे पुरस्कारही पटकावले आहेत. अनेक जाहिरांतीत झळकणाऱ्या संयमीला आता मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. मुळातच संयमीची आजी म्हणजेच अभिनेत्री उषाकिरण यांचे मराठी चित्रपटसृष्टीत मोठे योगदान होते. शंभरहून अधिक मराठी हिंदी चित्रपट करणा-या उषाकिरण यांच्याच अभिनयाचा वारसा असल्याने मराठीत त्याचा फायदा होईल, असा विश्वास संयमीने व्यक्त केला आहे......मराठी चित्रपटाला वेगळी उंची प्राप्त झाली आहे. मराठीतील ‘सैराट’ सारख्या चित्रपटांना हिंदीत केले जात आहे इतके महत्त्व मराठीला आले आहे. मुळातच मी मराठी मुलगी असल्याने मराठीत चित्रपट करताना आपल्या घरी आल्यासारखेच वाटते आहे.- संयमी खेर, अभिनेत्री
‘लई भारी’च्या सिक्वलमध्ये नाशिकची संयमी खेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 20:17 IST
मिर्झीया या हिंदी चित्रपटात पदार्पणातच पुरस्कार पटकावणारी आणि दक्षिणेतील चित्रपटातही अभिनयाची छाप पाडणारी नाशिकची कन्या संयमी खेर हिला आता रितेश देशमुख यांच्या आगामी माउली चित्रपटात नायिकेची भूमिका मिळाली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असून, जानेवारी महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
‘लई भारी’च्या सिक्वलमध्ये नाशिकची संयमी खेर
ठळक मुद्देनवा चित्रपट माउली : पुढील वर्षी प्रदर्शित होणार'मिर्झीया' बॉलिवूडमधील पहिला चित्रपट