वैनतेय विद्यालयात क्र ीडा महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 16:09 IST2019-01-09T16:09:07+5:302019-01-09T16:09:43+5:30

निफाड : न्या. रानडे महोत्सवानिमित्त येथील न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळ संचलित वैनतेय विद्यालयात क्र ीडा महोत्सवांतर्गत क्र ीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. मधुकर राऊत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व किरण कापसे यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

 Krida Festival in Ventee School | वैनतेय विद्यालयात क्र ीडा महोत्सव

वैनतेय विद्यालयात क्र ीडा महोत्सव

ठळक मुद्देप्रारंभी वैनतेय गीतमंचाने स्वागत गीत सादर केले. प्रास्तविक प्राचार्या मालती वाघवकर यांनी केले. रतन पाटील वडघुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

निफाड : न्या. रानडे महोत्सवानिमित्त येथील न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळ संचलित वैनतेय विद्यालयात क्र ीडा महोत्सवांतर्गत क्र ीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. मधुकर राऊत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व किरण कापसे यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी व्यासपीठावर मंडळाचे विश्वस्त वि. दा. व्यवहारे, किरण कापसे, मधुकर राऊत, श्रीमती एस.एन. पाटील, रेखा चौधरी, बी. वाय. सोनवणे, माधव जाधव, शारदा काळे, किरण उगलमुगले, मंजुषा ठाकरे, देवेंद्र सांबरे, अलका जाधव आदी उपस्थित होते.
विद्यालयाच्या एमसीसी पथकाने संचलन केले.

विद्यार्थ्यांनी संस्था गीत सादर केले. सूत्रसंचालन संदीप चकोर व सुभाष खाटेकर यांनी केले. आभार रेखा चौधरी यांनी मानले. महोत्सवात खो-खो, कबड्डी, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल यासह अथेलॅटिक्स योगासने ,बुद्धिबळ स्पर्धा होणार आहे, अशी माहिती शिक्षकांनी दिली.

Web Title:  Krida Festival in Ventee School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.