क्रांतिवीर भगतसिंग जयंती साजरी
By Admin | Updated: October 3, 2015 23:14 IST2015-10-03T23:14:01+5:302015-10-03T23:14:56+5:30
क्रांतिवीर भगतसिंग जयंती साजरी

क्रांतिवीर भगतसिंग जयंती साजरी
नाशिक : वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेतर्फे गद्रे मंगल कार्यालयात क्रांतिवीर भगतसिंग यांची १०९ वी जयंती साजरी करण्यात
आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य सचिव कॉ. मुकुंद रानडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमहापौर मनिष बस्ते, डॉ. दीपाली निकम हे होते. प्रारंभी पुष्पावती रुंग्टा शाळेतील विद्यार्थिनींनी देशभक्तिपर गाणी सादर केली, तर हर्षल नाईक व रूपेश बिऱ्हाडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी विकास भिंगार दिवे, मच्छिंद्र बोरसे, किरण उगले, हर्षल देवरे, अविनाश वाणी, रवींद्र शिंदे, विनोद चौधरी, स्वप्नील पाखले, राहुल घरटे, सय्यद फरहत, भावना चव्हाण, तृप्ती सुपेकर आदि उपस्थित होते.