डोमखडक येथे कोवीड लसिकरण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 00:16 IST2021-06-20T00:15:37+5:302021-06-20T00:16:16+5:30

पेठ : आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोपूर्ली खूर्द. व ग्रामपंचायत कोपूर्ली खूर्द. यांच्या सहकार्याने पेठ तालुक्यातील डोमखडक येथे शुक्रवारी (दि.१८) नागरिकांनी कोरोना लसीकरणाला उदंड प्रतिसाद दिला.

Kovid vaccination campaign at Domkhadak | डोमखडक येथे कोवीड लसिकरण मोहीम

डोमखडक येथे लसीकरण मोहीम प्रसंगी आरोग्य व वनविभागाचे कर्मचारी.

ठळक मुद्दे ४५ वर्षावरील अनेक नागरिकांना प्रतिबंधात्मक लस

पेठ : आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोपूर्ली खूर्द. व ग्रामपंचायत कोपूर्ली खूर्द. यांच्या सहकार्याने पेठ तालुक्यातील डोमखडक येथे शुक्रवारी (दि.१८) नागरिकांनी कोरोना लसीकरणाला उदंड प्रतिसाद दिला.

गत अनेक दिवसापासून आरोग्य विभाग नागरिकांना प्रबोधने, समुपदेशन करीत होते. तरीही नागरिक कोरोना लसीकरण घेण्यास पुढे येत नव्हते. ऐकीव अफवा, गैरसमज, चुकीच्या माहीतीमुळे नागरीक लस घेण्यास धजावत नव्हते. अखेर आरोग्य विभाग व ग्रामपंचायत यांच्या पुढाकाराने गावातील ४५ वर्षावरील नागरिकांना कोरोना लसीबाबत समस्या -अडचणी समजून त्याप्रमाणे समुपदेशन केले असता लाभार्थी लस घेण्यास तयार झाले. यावेळी गावातील ४५ वर्षावरील अनेक नागरिकांना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली.

यावेळी कोपुर्ली खूर्द उपकेंद्राचे सीएचओ योगेश्वर कहांडोळे, आरोग्यसेवक किसन ठाकरे, सुमित्रा चौधरी, रंजना कामडी, सरपंच हेमराज जाधव व ग्रामपंचायत सदस्य, वनविभागाचे कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते.
 

Web Title: Kovid vaccination campaign at Domkhadak