दिंडोरीत लोकसहभागातून कोविड विलगीकरण कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:25 IST2021-05-05T04:25:08+5:302021-05-05T04:25:08+5:30

यावेळी माजी नगराध्यक्ष प्रमोद देशमुख, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नागेश येवले, सचिन देशमुख , डॉ. वराडे, भास्करराव मोरे, डॉ. राहुल जाधव, ...

Kovid Separation Room from Public Participation in Dindori | दिंडोरीत लोकसहभागातून कोविड विलगीकरण कक्ष

दिंडोरीत लोकसहभागातून कोविड विलगीकरण कक्ष

यावेळी माजी नगराध्यक्ष प्रमोद देशमुख, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नागेश येवले, सचिन देशमुख , डॉ. वराडे, भास्करराव मोरे, डॉ. राहुल जाधव, डॉ. बनसोडे आदी उपस्थित होते. यावेळी मुख्याधिकारी नागेश येवले यांनी सर्वसामान्य दिंडोरीकरांनी देणग्या देऊन मदत केल्याने दिंडोरीकरांचे आभार मानले व लोकसहभागातून चांगले काम उभे करता येऊ शकते, असे सांगितले. माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी तालुक्यात वाढत असलेल्या रुग्णसंख्येबद्दल चिंता व्यक्त केली. दिंडोरी तालुक्याला शासनस्तरावर अधिकाधिक आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. राजे मंगल कार्यालयात उभारण्यात आलेल्या मिनी कोविड सेंटरमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे विलगीकरण करण्यात येणार आहे. त्यांना दिंडोरी शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली प्राथमिक औषध उपचार केले जाणार आहेत.

Web Title: Kovid Separation Room from Public Participation in Dindori