लोकसहभागातून उभे राहिले कोविड सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:13 IST2021-05-08T04:13:34+5:302021-05-08T04:13:34+5:30

उगाव, शिवडी व खेडे आणि परिसरात वाढते कोरोना रुग्ण तसेच वाढता मृत्युदर यामुळे उगावचे तलाठी राजेंद्र गायकवाड, ग्रामविकास अधिकारी ...

The Kovid Center stood out from the crowd | लोकसहभागातून उभे राहिले कोविड सेंटर

लोकसहभागातून उभे राहिले कोविड सेंटर

उगाव, शिवडी व खेडे आणि परिसरात वाढते कोरोना रुग्ण तसेच वाढता मृत्युदर यामुळे उगावचे तलाठी राजेंद्र गायकवाड, ग्रामविकास अधिकारी जगन्नाथ गायकवाड, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. कलिम पठाण, आरोग्य सेवक चौधरी, आरोग्य सेविका व आशा कार्यकर्त्या यांची कोरोना काळात मोठी धावपळ होत होती. परिसरातील कोरोनाबाधित रुग्णांना जवळच अथवा गावात वेळेवर उपचार मिळावेत ही लोकभावना दृढ होत गेली. त्यानंतर तातडीने उगाव येथे कोविड केअर सेंटर स्थापन करण्याचा प्रस्ताव निफाड तहसील कार्यालय व पंचायत समिती निफाड यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला. उगाव येथे तातडीने कोविड केअर सेंटर स्थानिक नागरिकांच्या लोकसहभागातून सुरू करण्याचे आदेश जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिले व आरोग्य खात्याने आवश्यक ते आरोग्य कर्मचारी पुरविण्याचे आदेशही दिले. उगावचे तलाठी राजेंद्र गायकवाड यांनी स्वतःचे २१ हजार रुपये देत सुरुवात करून दिली. गायकवाड यांनी मान्यवरांसह गावातील तरुणांना मदतीला घेऊन आर्थिक मदत जमा केली. उगावचे पृथ्वीराज मधुकर ढोमसे यांनी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची मदत केली. समाज माध्यमातून आवाहन केल्यामुळे पाच-सहा दिवसांतच पाच लाख वीस हजार रुपयांची आर्थिक मदत उभी राहिली. तसेच उगावकरांनी पलंग, गाद्या, उशा, ऑक्सिजन सिलिंडर, सॅनिटायझर आदी वस्तू रूपाने मदत दिली. या लोकसहभागातून छत्रपती शिवाजी महाराज कोविड केअर सेंटर उभे राहिले. या सेंटरमध्ये ५० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

इन्फो

९० वर्षांच्या आजीबाईंच्या हस्ते उद‌्घाटन

उगाव येथील ९० वर्षांच्या आजी श्रीमती कौशल्याबाई मधुकर ढोमसे यांच्या हस्ते या कोविड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आमदार दिलीप बनकर, जि. प. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, तहसीलदार शरद घोरपडे, सर्कल ऑफिसर शीतल कुयटे, पं. स. सदस्य सोमनाथ पानगव्हाणे आदी उपस्थित होते. पहिल्याच दिवशी पाच रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.

फोटो : ०७उगाव कोविड

उगाव येथे लोकसहभागातून उभे राहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कोविड सेंटरचे उद‌्घाटन करताना श्रीमती कौशल्याबाई ढोमसे. समवेत आमदार दिलीप बनकर, जि.प. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, पं.स. सदस्य सोमनाथ पानगव्हाणे, विजय ढोमसे आदी.

===Photopath===

070521\07nsk_9_07052021_13.jpg

===Caption===

फोटो : ०७उगाव कोवीड

Web Title: The Kovid Center stood out from the crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.