जावयास आत्महत्त्येस प्रवृत्त करणाऱ्या संशयितांना कोठडी

By Admin | Updated: September 27, 2016 01:17 IST2016-09-27T01:16:42+5:302016-09-27T01:17:08+5:30

जावयास आत्महत्त्येस प्रवृत्त करणाऱ्या संशयितांना कोठडी

Kothadi to the suspects who have been motivated to commit suicide | जावयास आत्महत्त्येस प्रवृत्त करणाऱ्या संशयितांना कोठडी

जावयास आत्महत्त्येस प्रवृत्त करणाऱ्या संशयितांना कोठडी

सिडको : कौटुंबिक वादास कंटाळलेल्या शिवाजी लक्ष्मण पावले (रा़ स्वामीनगर, रचित रो-हाउस, अंबड, नाशिक) या शिक्षकाने रविवारी (दि़२५) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना घडली होती़ याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात त्याची पत्नी, सासू-सासरे व दोन शालकांवर आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या पाचही जणांना न्यायालयात हजर केले असता २८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़
संतोष पावले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिवाजी व त्याची पत्नी ताईबाई यांच्यात नेहमी वाद होत असल्याने ताईबाई ही सिन्नर तालुक्यातील हिवरगाव या आपल्या माहेरी निघून गेली होती़ या कौटुंबिक वादात समझोता करण्याच्या कारणासाठी शिवाजीची पत्नी ताईबाई, विठोबा भिकाजी पोमनार (सासरे), चंद्रकला विठोबा पोमनार (सासू), सोमनाथ व संजय विठोबा पोमनार (मेहुणे) यांनी हिवरगावला बोलावून घेतले़ याठिकाणी कुरापत काढून शिवाजी व त्यांचे काका यांना मारहाण करून शिवीगाळ केली़ तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला़ त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केली़ तसेच आत्महत्त्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये यास पत्नी, सासू-सासरे व मेव्हणे जबाबदार असल्याचे लिहिले आहे़

Web Title: Kothadi to the suspects who have been motivated to commit suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.