राष्ट्रीय लॉन टेनिसमध्ये कोमलला सुवर्ण
By Admin | Updated: May 16, 2014 00:41 IST2014-05-15T21:38:03+5:302014-05-16T00:41:11+5:30
नाशिक : राष्ट्रीय मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत १८ वर्षे वयोगटात नाशिकच्या कोमल नागरे हिने सुवर्णपदक पटकावले़

राष्ट्रीय लॉन टेनिसमध्ये कोमलला सुवर्ण
नाशिक : राष्ट्रीय मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत १८ वर्षे वयोगटात नाशिकच्या कोमल नागरे हिने सुवर्णपदक पटकावले़
अखिल भारतीय टेनिस संघटना व मराठवाडा टेनिस सेंटरच्या वतीने औरंगाबाद येथे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते़ यामध्ये मुलींच्या १८ वर्षे वयोगटात कोमल संजय नागरे हिने अत्यंत आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्ध्यांना हरवून विजय संपादन केले़ तिने उपांत्यपूर्व फे रीत गोव्याच्या सिमरन खानचा ५-४ व ७-० च्या गोल फ रकाने पराभव केला, तर उपांत्य फे रीत महाराष्ट्राच्याच अपूर्वा रोकडेला ५-७, ७-०, ६-४ असे पराभूत केले़ अंतिम फे रीत आक्रमक खेळ करताना मुंबईच्या सुप्रभा पुजारीचा ६-३, १-६, १०-८ असा पराभव करत अजिंक्यपद पटकावले़ सुवर्णपदकासह तिला १५ राष्ट्रीय गुणांची प्राप्ती झाली़
कोमलला नाशिक जिमखान्याचे प्रशिक्षक राकेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले़
फ ोटो - 12 पीएचएमए08 - कोमल नागरे