तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत के. के. वाघ विद्याभवन संघ अजिंक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 18:02 IST2019-08-28T18:01:45+5:302019-08-28T18:02:09+5:30
निफाड : निफाड तालुकास्तरीय सतरा वर्ष वयोगटाच्या आतील मुलींच्या खो खो स्पर्धेत उगाव येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल व दिनकरराव पानगव्हाणे कनिष्ठ महाविद्यालयाने अजिंक्यपद मिळवले.

निफाड तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत अजिंक्य ठरलेल्या उगाव विद्यालयातील मुलींच्या संघाचा सत्कार करताना अध्यक्ष मधुकर ढोमसे समवेत प्राचार्य कैलास गवळी पर्यवेक्षक सुनील शिंदे व शिक्षक.
निफाड : निफाड तालुकास्तरीय सतरा वर्ष वयोगटाच्या आतील मुलींच्या खो खो स्पर्धेत उगाव येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल व दिनकरराव पानगव्हाणे कनिष्ठ महाविद्यालयाने अजिंक्यपद मिळवले.
निफाड तालुक्यात पावसाळी तालुकास्तरीय क्र ीडा स्पर्धाचे आयोजन भाऊसाहेबनगर येथील के. के. वाघ विद्याभवन येथे करण्यात आले होते.
या स्पर्धेत उगाव येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल व दिनकरराव पानगव्हाणे कनिष्ठ महाविद्यालयाने सतरा वर्ष वयोगटाच्या आतील मुलींच्या गटात डोंगरगाव विद्यालयाच्या मुलींच्या संघाचा एक डाव, पाच गुणांनी पराभव केला. तर मुलांच्या खो खो स्पर्धेत भाऊसाहेबनगर येथील के. के. वाघ विद्याभवनचा संघ अजिंक्य ठरला. तर निफाड येथील वैनतेय विद्यालयाचा मुलांचा संघ उपविजेता झाला.
या स्पर्धेसाठी पंच म्हणून भालचंद्र सूर्यवंशी, डी.एम. थेटे, गोविंद कांदळकर, आर. के. सानप, शिरसाठ यांनी काम पाहिले. तालुकास्तरीय सतरा वर्ष वयोगटाच्या आतील मुलींच्या खो खो स्पर्धेत अजिंक्य ठरलेल्या मुलींच्या संघाचा सत्कार उगाव येथे विनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मधुकर ढोमसे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य कैलास गवळी, पर्यवेक्षक सुनील शिंदे आदींसह शिक्षक उपस्थित होते.