अपहरणातील संशयित कोळेकरला कोठडी
By Admin | Updated: October 2, 2014 00:17 IST2014-10-01T23:07:32+5:302014-10-02T00:17:51+5:30
अपहरणातील संशयित कोळेकरला कोठडी

अपहरणातील संशयित कोळेकरला कोठडी
नाशिक : सिडकोतील विश्वनाथ दातीर यांच्या अपहरण प्रकरणातील संशयित भारती कोळेकरला न्यायालयाने ४ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ शिंदे गावात शेतकऱ्यांचा टेम्पो अडवून लूट करून गोळीबार करणारे व अपहरणामध्ये प्रमुख भूमिका असलेले चारही संशयित एकच असून, ते फरार आहेत़ सिडकोतील महालक्ष्मी चौकात राहणारे विश्वनाथ दातीर यांनी टेम्पो विकत घेण्यासाठी संशयित भारती कोळेकर (रा़ शिवशक्ती चौक) यांच्याकडून पन्नास हजार रुपये उसनवार घेतले होते़ उसनवार घेतलेल्या पैशांची परतफेड करण्यास उशीर होत असल्याने भारती कोळेकरने संशयित अभय पाटील, निखिल गवळी, राकेश सोनार व संतोष कोतेवाड यांच्यामार्फत रविवारी अपहरण केल्याची फिर्याद विश्वनाथ दातीर यांनी अंबड पोलिसांत दिली होती़ या प्रकरणी कोळेकरला अंबड पोलिसांनी अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले असता ४ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़