शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

नाशिककरांना चाखयला मिळाला कोकण हापूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 16:05 IST

नुसते नाव ऐकले तरी तोंडाला पाणी आणणाऱ्या कोकणच्या हापूसाचा स्वाद नाशिककरांना गेल्या आठवडाभर चाखायला मिळाला. महाराष्ट्र राज्य पणन मंडळाने आयोजित केलेल्या आंबा महोत्सवात कोकणच्या शेतकऱ्यांनी रत्नागिरी, देवगड, राजापूरच्या हापूस विक्रीसाठी ठेवला होता. थेट शेतकऱ्यांच्या आमराईतून आलेल्या या आंब्यांची नाशिककरांनाही चांगलीच भूरळ पडल्याचे पहायला मिळाले.

ठळक मुद्देनाशिककरांनी चाखला कोणच्या हापूसचा स्वादपणन मंडळाच्या आंबा महोत्सवाला उत्फूर्त प्रतिसाद आंबा महोत्सवात 20 लाख रुपयांची उलाढाल

नाशिक : नुसते नाव ऐकले तरी तोंडाला पाणी आणणाऱ्या कोकणच्या हापूसाचा स्वाद नाशिककरांना गेल्या आठवडाभर चाखायला मिळाला. महाराष्ट्र राज्य पणन मंडळाने आयोजित केलेल्या आंबा महोत्सवात कोकणच्या शेतकऱ्यांनी रत्नागिरी, देवगड, राजापूरच्या हापूस विक्रीसाठी ठेवला होता. थेट शेतकऱ्यांच्या आमराईतून आलेल्या या आंब्यांची नाशिककरांनाही चांगलीच भूरळ पडल्याचे पहायला मिळाले. कोकणची ओळख असलेल्या हापूसचा प्रामुख्याने समावेश असलेल्या आंबा महोत्सवाला नाशिककरांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला. पणन मंडळाच्या नाशिक शाखेतर्फे रावसाहेब थोरात सभागृहाच्या आवारात मंगळपारपासून सुरू असलेल्या आंबा महोत्सवाचा रविवारी (दि.20) समारोप झाला. अशाप्रकारे शासकीय यंत्रणोमार्फत नाशिकमध्ये पहिल्यांदाच आयोजित आंबा महोत्सवाला नाशिककरांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने कोकणातून नाशिकमध्ये आबा विक्रीसाठी आलेल्या शेतक:यांनीही समाधान व्यक्त केले असून अशाप्रकारे दरवर्षी आंबा महोत्सवाचे नियोजन होण्याची गरज कोकणच्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली.त्यामुळेच रविवापर्यंत चालणाऱ्या महोत्सवात बहूंतांश शेतकऱ्यांचे आंबे शनिवारपर्यंत सपल्याचे दिसून आले. या आंबा महोत्सवात रत्नागिरी, देवगड, राजापूर, चिपळूण, सिंधुदुर्ग आदी परिसरातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आंबे उपलब्ध असल्याने नाशिककरांची या आंब्याना चागलीच पसंती मिळाली. आंबा महोत्सवात 300ते 700रुपये डजनापासून आकारानुसार तीन ते पाच डझनाची लाकडी पेटी 2 हजार रुपयांपासून मिळत असल्याने अनेक ग्राहकांनी थेट पेटीच खरेदी करणो पसंत केले. त्यामुळे रविवापर्यंत चालणाऱ्या या आंबा महोत्सवात सहभागी शेतकऱ्यांचा माल शनिवारीच संपल्याची माहिती पणन मंडळातर्फे देण्यात आली. दरम्यान, ग्राहकांचा ओघ पाहून काही शेतकऱ्यांनी रविवारी काही प्रमाणात नव्याने माल मागविल्याची माहीती पणन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.20 लाख रुपयांंची उलाढालआंबा महोत्सवात सहभागी 14 शेतकऱ्यांचा जवळपास सर्व माल विकला गेल्याने या महोत्सवात सहभागी शेतकऱ्यांचा प्रत्येकी 1 लाख 25 हजार ते दीड लाख रुपयांपर्यत व्यावसाय झाला. त्यामुळे या आंबा महोत्सवात सुमारे 20 ते 21 लाख रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती पणन मंडळाने दिली आहे.

टॅग्स :MangoआंबाNashikनाशिकFarmerशेतकरी