‘ढोकेश्वर’चे संस्थापक काळे यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:47 IST2017-09-11T23:46:58+5:302017-09-11T23:47:04+5:30

लासलगाव : येथील ढोकेश्वर मल्टिस्टेट सोसायटीमध्ये ठेवीचे व नोकरीसाठी दिलेले पैसे मिळत नसल्याच्या तक्रारीवरून जिल्ह्यातील नऊ शाखांसह संस्थापकाच्या राहत्या घरावर छापा मारण्यात आला होता. गेल्या दोन दिवसांपासून फरार असलेले संस्थापक सतीश काळे यांना मोबाइलचे लोकेशन व मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे लासलगाव पोलिसांनी सोमवारी दुपारी अटक केली.

Kok, the founder of 'Dhokeshwar', was arrested | ‘ढोकेश्वर’चे संस्थापक काळे यांना अटक

‘ढोकेश्वर’चे संस्थापक काळे यांना अटक

लासलगाव : येथील ढोकेश्वर मल्टिस्टेट सोसायटीमध्ये ठेवीचे व नोकरीसाठी दिलेले पैसे मिळत नसल्याच्या तक्रारीवरून जिल्ह्यातील नऊ शाखांसह संस्थापकाच्या राहत्या घरावर छापा मारण्यात आला होता. गेल्या दोन दिवसांपासून फरार असलेले संस्थापक सतीश काळे यांना मोबाइलचे लोकेशन व मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे लासलगाव पोलिसांनी सोमवारी दुपारी अटक केली.
ढोकेश्वर मल्टिस्टेट सोसायटीमध्ये गुंतवणूक केलेले त्याचबरोबर नोकरीसाठी भरलेले पैसे मिळत नसल्याने लासलगाव पोलीस ठाण्यात सोसायटीचे संस्थापक सतीश काळे यांच्या विरोधात तक्र ारी दाखल झाल्या. गेल्या दोन दिवसांपासून ते फरार होते. अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी निफाड न्यायालयात प्रयत्न केल्याची माहिती आहे.

Web Title: Kok, the founder of 'Dhokeshwar', was arrested