शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सिगारेट आणण्यावरुन झालेल्या वादात चाकूने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 16:55 IST

सुलतान सोडवण्यासाठी गेला असता सुमीत खरात याने हातातील चाकूने त्यावर वार करून जखमी केले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : सिगारेट आणण्यावरुन झालेल्या वादात दोघा सराईत गुंडांनी मिळून एकास बेदम मारहाण करत चाकूने हातावर वार केल्याची घटना नाशिकरोडच्या गांधीनगर परिसरात गुरूवारी (दि.२७) रात्री घडली. अमोल खरात व सुमीत खरात (पुर्ण पत्ता नाही) अशी संशयितांची नावे ओहत. याप्रकरणी सुलतान बाबु शेख (२३, रा. नुराणी गल्ली, भारतनगर झोपडपट्टी, मुंबईनाका) याने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार गुरूवारी सुलतान याच्या भावास संशयितांनी सिगारेट आणण्यास सांगीतले त्याने नकार देताच संशयितांनी त्यास बेदम मारहण केली. सुलतान सोडवण्यासाठी गेला असता सुमीत खरात याने हातातील चाकूने त्यावर वार करून जखमी केले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विमा कार्यालयातून जनित्र लांबविले

नाशिक : गंगापुररोडवरील एका विमा कंपनीच्या कार्यालयाचा वाहनतळात बसविण्यात आलेले जनित्र अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार गंगापूर रोडच्या जेहान सर्कल परिसरात घडला आहे. याप्रकरणी हरिशचंद्र निकम (रा. इंद्रनगरी, कामठवाडा) यांनी तक्रार दाखल केली आहे. हृषीराज टॉवर येथे तेजस फेडरल लाईफ इन्शुरन्स कंपनीचे कार्यालय आहे. कार्यालयासाठी लागणारे जनित्र इमारतीच्या वाहनतळात ठेवण्यात आलेले होते. चोरट्यांनी सुमारे ४० हजार रूपये किंमतीचे भंगार अवस्थेत बंद पडलेले जनित्र २२ मे रोजी रात्री चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी