चाकूचा धाक दाखवून लुटले
By Admin | Updated: March 15, 2016 00:27 IST2016-03-14T23:06:06+5:302016-03-15T00:27:40+5:30
चाकूचा धाक दाखवून लुटले

चाकूचा धाक दाखवून लुटले
निफाड : तालुक्यातील चेहेडी खुर्द येथील सोमनाथ वामन शिंदे हे आठवडे बाजारासाठी शनिवारी सकाळच्या सुमारास नाशिकला आले होते़ ओढ्याजवळील नाशिक - औरंगाबाद चौफुलीवर उभे असताना संशयित गणेश गौतम गायकवाड (१८, फुलेनगर, पंचवटी) व विशाल प्रभाकर मोहिते (१९, रा़ मायको दवाखान्याजवळ, दिंडोरीरोड, फुलेनगर) या दोघांनी शिंदे यांच्या पोटास चाकू लावून त्यांच्याकडील आठ हजार रुपये किमतीचा मोबाइल दमदाटी करून काढून घेतला़
या प्रकरणी शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलीस ठाण्यात संशयित गायकवाड व मोहितेविरुद्ध जबरी लुटीचा
गुन्हा दाखल करण्यात आला
आहे़ (प्रतिनिधी)