दुकानदारावर चाकूने हल्ला
By Admin | Updated: April 18, 2017 01:37 IST2017-04-18T01:37:14+5:302017-04-18T01:37:29+5:30
दुकानदारावर चाकूने हल्ला

दुकानदारावर चाकूने हल्ला
मालेगाव : शहरातील पवारवाडी भागातील ज्यूस दुकानदारावर धारदार चाकूने हल्ला केल्याप्रकरणी पवारवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. जखमी शेख रफीक शेख अब्दुल (३५) यांनी फिर्याद दिली. तू माझ्या सासू व साल्याच्या घराचे पाणी बंद का केले, अशी कुरापत काढून आफीक शफीक अन्सारी याने शेख रफीक यांच्या मांडीवर, हाताच्या दंडावर चाकूने वार करून गंभीररीत्या जखमी केले. रविवारी दुपारी ४ वाजता ही घटना घडली. रफीक शेख यांच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास हवालदार मोरे करीत आहेत. (प्रतिनिधी)