शरणपूर रोडवर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:16 IST2021-05-18T04:16:20+5:302021-05-18T04:16:20+5:30

नाशिक : घरगुती वादातून उडालेल्या ठिणगीमुळे मोठ्या भावाला लोखंडी रॉडने मारहाण केल्यानंतर पळणाऱ्याला पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर त्याने चाकूने हल्ला ...

Knife attack on Sharanpur Road | शरणपूर रोडवर चाकूहल्ला

शरणपूर रोडवर चाकूहल्ला

नाशिक : घरगुती वादातून उडालेल्या ठिणगीमुळे मोठ्या भावाला लोखंडी रॉडने मारहाण केल्यानंतर पळणाऱ्याला पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर त्याने चाकूने हल्ला करून जखमी केल्याची घटना शरणपूर रोड परिसरात शनिवारी (दि.१५) रात्री घडली.

विजय रॉबर्ट मारी (४९, बेथेल नगर, शरणपूर रोड) असे हल्ला करणार्‍या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी मुकेश मधुकर वाघमारे (३४, रा. बेथेल नगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार वाघमारे हे रूग्णालयाचे काम संपवून घरी येत असताना, त्यांना शेजारील विजय मारी हा पळताना दिसला तर त्याच्या मागे त्याची आई तसेच घरातील इतर सदस्य पळत होते. वाघमारे यांनी विजय याला पकडले असता, त्याने हातातील चाकूने वार करून तसेच चावा घेऊन पुन्हा पळ काढला. यात वाघमारे हे जखमी झाले. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Knife attack on Sharanpur Road