पांगरी : येथील श्री संत हरिबाबा विद्यालयात सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांची एकतेची प्रतीकात्मक पतंग तयार करून तिळगूळ वाटप करून मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.उपशिक्षक यू. के. मुंडे व श्रीमती के.एम.गिते यांनी विद्यार्थ्यांना संक्रांती सणाचे महत्त्व सांगून पतंग उडविताना घ्यावयाची काळजी व प्राणीपक्ष्यांना होणारा धोका याविषयी मार्गदर्शन केले. पाचवी ते दहावीच्या एकूण २५५ विद्यार्थ्यांनी मिळून सदर एकतेची पतंग विद्यालयाच्या कला सांस्कृतिक विभागातर्फे कलाशिक्षक जी. डी. गायकवाड यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आली.मुख्याध्यापक डी.बी. गोसावी, वाय.एम. मुर्तडक, डी.एस. जगताप, ए. पी. गाडेकर, वाय. एस. गायकवाड, व्ही. एस. हजारे, एम. पी. अहिरे, आर. डी. बेंडकोळी, बी. बी. नेटके, सुनील दळवी, एस.एस. साळुंके, ए.के. बैरागी यांचे सहकार्य लाभले.
संत हरिबाबा विद्यालयात साकारली एकतेची पतंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 00:32 IST