मालेगाव महापालिका आयुक्तपदी किशोर बोर्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 01:33 IST2018-12-27T01:33:35+5:302018-12-27T01:33:55+5:30

येथील महापालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे यांची बदली झाल्याने आयुक्तपदी किशोर बोर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र आयुक्त निवडीवरून भाजपात राजीनामा सत्र सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 Kishore Borde of Malegaon municipal commissioner | मालेगाव महापालिका आयुक्तपदी किशोर बोर्डे

मालेगाव महापालिका आयुक्तपदी किशोर बोर्डे

मालेगाव : येथील महापालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे यांची बदली झाल्याने आयुक्तपदी किशोर बोर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र आयुक्त निवडीवरून भाजपात राजीनामा सत्र सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.  या नियुक्तीला भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष सुनील गायकवाड यांनी विरोध दर्शवला असून, महानगर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा गुरुवारी ग्रामीणचे जिल्हाप्रमुख दादा जाधव यांच्याकडे सुपुर्द करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आयुक्त निवडीवरून भाजपात राजीनामा सत्र सुरू होण्याची शक्यता आहे.
मालेगाव महापालिकेच्या आयुक्तपदी रुजू होण्याचे आदेश नगरविकास विभागाचे उपसचिव कैलास बधान यांनी दिले आहे. बोर्डे हे राजकीय दबावाला बळी पडणारे आहेत. त्यांचा पारदर्शक कारभार नसल्याने त्यांच्याऐवजी दुसऱ्या अधिकाºयाची आयुक्तपदी नियुक्ती करावी, अशी मागणी भाजपाच्या नगरसेवकांनी शासनाकडे केली होती; मात्र शासनाने बोर्डे यांची नियुक्ती केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे जिल्हा महानगर अध्यक्ष सुनील गायकवाड यांनी त्यांचा पदाचा राजीनामा देण्याची तयारी केली आहे. कर्तव्य कठोर आयुक्त संगीता धायगुडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी बोर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीला राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांनी व काही नगरसेवकांनी विरोध दर्शवला आहे.
बोर्डे यांनी यापूर्वी औरंगाबाद महापालिकेत उपायुक्तपदी तसेच मालेगाव महापालिकेत १ सप्टेंबर २०१५ ते ४ मे २०१६ या आठ महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. ते सध्या नाशिक महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी कार्यरत होते.

Web Title:  Kishore Borde of Malegaon municipal commissioner