शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

किसान सभा : मंत्रालयाकडे प्रयाण; विविध मागण्यांसाठी १२ रोजी विधिमंडळाला घेराव घालणार ऊनझळा सोसत ‘लॉँग मार्च’ची आगेकूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 1:34 AM

इगतपुरी : ‘गुजरातसाठी धरण, आदिवासींसाठी मरण चालणार नाही, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ अशा नानाविध घोषणा देत २५ ते ३० हजार शेतकºयांचा सहभाग असलेला ‘लॉँग मार्च’ गुरुवारी सकाळी घाटनदेवीपासून मंत्रालयाच्या दिशेने मार्गस्थ झाला.

ठळक मुद्देमोर्चातील लक्षणीय उपस्थिती महामार्गावरील बघ्यांचे लक्ष वेधून घेत होती देवस्थान आणि इनामी जमिनी कसणाºयांनाच द्याव्यात

इगतपुरी : ‘गुजरातसाठी धरण, आदिवासींसाठी मरण चालणार नाही, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ अशा नानाविध घोषणा देत २५ ते ३० हजार शेतकºयांचा सहभाग असलेला ‘लॉँग मार्च’ गुरुवारी सकाळी घाटनदेवीपासून मंत्रालयाच्या दिशेने मार्गस्थ झाला. ऊनझळा सोसत निघालेल्या या मोर्चातील लक्षणीय उपस्थिती महामार्गावरील बघ्यांचे लक्ष वेधून घेत होती. १२ मार्चला हा मोर्चा मुंबईत पोहचल्यावर विधिमंडळाला घेराव घालण्यात येणार असल्याची माहिती राज्य किसान सभेच्या पदाधिकाºयांनी मोर्चाप्रसंगी दिली़राज्य किसान सभेच्या वतीने कॉ. जिवा पांडू गावित, अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष कॉ. अशोक ढवळे, कॉ. अजित नेवले यांच्या नेतृत्वाखाली नाशिकहून शेतकºयांच्या लॉँग मार्चला मंगळवार, दि़ ६ मार्चपासून प्रारंभ झाला. २००८ मध्ये तयार करण्यात आलल्या वनहक्क कायद्याची त्वरित अंमलबजावणी करावी, देवस्थान आणि इनामी जमिनी कसणाºयांनाच द्याव्यात, विना अट सर्व शेतकºयांना कर्जमुक्ती द्यावी, वीजबिल माफ करावे, दुष्काळग्रस्त भागात दमण गंगा, नार-पार योजनेचे पाणी द्यावे, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी आदींसह विविध मागण्यांसाठी राज्य किसान सभेच्या वतीने हा लॉँग मार्च काढण्यात आला आहे. या मोर्चात महाराष्टÑासह मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, सांगली, सातारा येथील शेतकरी सहभागी झाले असून, प्रत्येक मुक्कामानंतर या संख्येत भर पडत असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी रात्री घाटनदेवी परिसरात मुक्काम केल्यानंतर मार्गक्रमित झालेले मोर्चेकरी गुरुवारी सायंकाळी मुक्कामासाठी कळमगाव येथे थांबले आहेत. मोर्चाचे नियोजन मोर्चा सुरळीत पार पडावा यासाठी सहभागी शेतकºयांच्या जिल्हा व तालुकानिहाय २५० ते ३०० ग्रामसमित्या करण्यात आल्या आहेत. या समित्यांकडून घेतलेल्या शिध्याच्या साहाय्याने भोजनव्यवस्था सांभाळली जात आहे. गटनिहाय नाश्ता, जेवणाची व्यवस्था स्वतंत्रपणे केली जात आहे. मोर्चेकरांसाठी पाण्याचे ५० टॅँकर तसेच महाराष्ट्र सीटू मेडिकल संघटनेमार्फत आरोग्यसुविधा पुरविली जात आहे. स्वच्छतागृहाची सुविधा मुक्कामस्थळी सोयीप्रमाणे केली जात आहे.मोर्चेकºयांची दैनंदिनीरोज पहाटे ५ वाजता मोर्चेकºयांना उठविले जाते. ६ वाजेपर्यंत नाश्ता करून ६.३० वाजता पुढील मार्गक्रमणास सुरुवात होते. दुपारी १२ वाजता नियोजित ठिकाणी भोजन झाल्यानंतर मोर्चा पुन्हा मार्गस्थ होतो. रात्री मुक्कामस्थळी महामार्गालगतच निवासाची व्यवस्था केली जाते. मोर्चेकरी रोज ३० किलोमीटर प्रवास करतात. दिमतीला पाणी तसेच आरोग्यसुविधाही असते. या मोर्चात महिलांसह तरुण व वृद्धांचा सहभाग लक्षणीय आहे.