शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरी तहसीलमध्ये किसान सभेचा मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:12 IST

शासनाविरोधात विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने दिंडोरी येथील तहसील कार्यालयावर बिºहाड मोर्चा सुरूच असून, दुसºया दिवशीही मुक्काम ठोकला आहे.

ठळक मुद्देबिºहाड मोर्चा : शासनाविरोधात घोषणाबाजी, तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच

दिंडोरी : शासनाविरोधात विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने दिंडोरी येथील तहसील कार्यालयावर बिºहाड मोर्चा सुरूच असून, दुसºया दिवशीही मुक्काम ठोकला आहे.माकपचे जिल्हा सचिव सुनील मालुसरे, तालुका सचिव रमेश चौधरी, डीवायएफआय तालुका अध्यक्ष आप्पा वाटणे, किसान सभा तालुकाध्यक्ष देवीदास वाघ, जनवादी महिला संघटनेच्या तालुकाध्यक्ष लक्ष्मीबाई काळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरूच आहे. तिसºया दिवशीही त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही. सोमवारी सकाळी किसान सभेच्या वतीने बाजार समितीच्या पटांगणातून बिºहाड मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चा दिंडोरी तहसील कार्यालयावर येऊन धडकला. रात्री मुक्काम केला, मंगळवारी सकाळी पुन्हा किसान सभेच्या कमिटीला प्रशासनाने फक्त काही मागण्यांना तोंडी आश्वासन दिले, मात्र वणी, ननाशी, करंजाळी, फॉरेस्ट रेंजरचा मनमानी कारभार थांबवावा, वनहक्क दावे तत्काळ निकाली काढावे, या मुद्द्यांवर ठोस निर्णय न झाल्याने आंदोलन पुन्हा सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यास आंदोलनकर्त्यांनी पाठिंबा दर्शविल्याने आंदोलन तिसºया दिवशीही सुरूच ठेवले आहे. यावेळी उपस्थित मोर्चेकऱ्यांना सुनील मालुसरे, रमेश चौधरी, लक्ष्मीबाई काळे, आप्पा वटाणे यांनी मार्गदर्शन केले.आंदोलनकर्त्यांनी मंगळवारी दिवसभर अभंग, भारूडे, भक्तिगीते, गात शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दिंडोरी तालुक्यातील वनहक्क दावे प्रलंबित आहे. अनेक ठिकाणी वनविभागाचे कर्मचारी आमच्या नागरिकांना नाहक त्रास देऊन मनमानी करतात, ते थांबले पाहिजे. चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत, मात्र प्रशासन ठोस निर्णय देत नाही म्हणून मोर्च्याच्या माध्यमातून झोपलेल्या प्रशासनाला जागे करावे लागत आहे, असे माकपाचे दिंडोरी तालुका सचिव रमेश चौधरी यांनी सांगितले.या आहेत मागण्या...दिंडोरी तहसील कार्यालयाकडून नवीन व विभक्त रेशन कार्डची त्वरित अंमलबजावणी करावी, वयोवृद्धांना दरमहा एक हजाररु पये पेन्शन सुरू करावी, जीर्ण झालेले रेशनकार्ड त्वरित नवीन करून द्यावे, वनहक्क दावे तत्काळ रद्द करण्याची मागणी

टॅग्स :Kisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्चStrikeसंप