कीर्ती चित्ते यांना पीएच.डी.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:12 IST2021-07-16T04:12:02+5:302021-07-16T04:12:02+5:30
नीलेश आंबेडकर यांची प्रोजेक्ट हंड्रेडसाठी निवड नाशिक : पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या ‘प्रोजेक्ट हंड्रेड’ संस्थेच्या महाराष्ट्र चॅप्टरसाठी नीलेश आंबेडकर ...

कीर्ती चित्ते यांना पीएच.डी.
नीलेश आंबेडकर यांची प्रोजेक्ट हंड्रेडसाठी निवड
नाशिक : पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या ‘प्रोजेक्ट हंड्रेड’ संस्थेच्या महाराष्ट्र चॅप्टरसाठी नीलेश आंबेडकर यांची निवड करण्यात आली आहे. पर्यावरण क्षेत्रात जनजागृती तसेच पर्यावरण विश्वविद्यालय स्थापन करण्यासाठीच्या दृष्टीने संस्थेचे कामकाज सुरू असल्याने याविषयीची व्यापकता वाढविण्यासाठी संस्थेकडून पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असल्याचे संस्थेचे अध्यक्ष सुरज गायकवाड यांनी पत्रकात म्हटले आहे.
(फाेटाे स्कॅन)
लक्ष्मीनारायण भजनी मंडळाची कार्यकारिणी
नाशिक : जुने नाशिकमधील लक्ष्मीनारायण भजनी मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. रघुनाथसिंह परदेशी यांनी दिली. सन २०२१-२२ वर्षासाठी निवडण्यात आलेल्या कार्यकारिणी अध्यक्षपदी ह.भ.प. विठ्ठल मांडवगणे यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी ह.भ.प. मदुकर पुंजाजी चव्हाण, उपाध्यक्ष ह.भ.प. त्र्यंबक गजानन शिंदे, सचिव ह.भ.प. वसंतसिंह ठाकूर, प्रमुख कार्यवाह ह.भ.प. डाॅ. रघुनाथ सोनवणे, सांस्कृतिक प्रमुख ह.भ.प. अविनाश कडवे यांची निवड करण्यात आली.
(फाेटाे स्कॅन)