टिप्पर गँगकडून कैद्यास मारहाण

By Admin | Updated: December 12, 2015 00:01 IST2015-12-11T23:57:23+5:302015-12-12T00:01:55+5:30

कारागृहातील प्रकार

Kipar Gang assaulted by Tipper gang | टिप्पर गँगकडून कैद्यास मारहाण

टिप्पर गँगकडून कैद्यास मारहाण

नाशिक : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील मुलाखत कक्षात सिडकोतील कुप्रसिद्ध टिप्पर गँगचा म्होरक्या समीर नासीर पठाण व त्याच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी (दि़ ११) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास एका कैद्यास बेदम मारहाण केल्याचे वृत्त आहे़ या कैद्यासोबत टिप्पर गँगचे पूर्वीपासून वाद असल्याचे समोर आले असून या प्रकाराबाबत कुठलीही वाच्यता होऊ नये म्हणून कारागृह प्रशासनाकडून पुरेपूर खबरदारी घेतल्याचे वृत्त आहे़
सिडकोतील  टिप्पर गँगचा म्होरक्या समीर पठाण व त्याचे साथीदार यांना शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास नातेवाईक व मित्रांसोबत मुलाखतीसाठी वेळ देण्यात आल्याने ते सर्व मुलाखत कक्षामध्ये आले होते़ त्याचवेळी पूर्ववैमनस्य असलेला एक कैदी मुलाखत कक्षामध्ये हजर होता़ त्या कैद्यासोबत वाद झाल्याने पठाण व त्याच्या साथीदारांनी त्यास बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याचे वृत्त आहे़ मात्र, या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात कुठल्याही प्रकारची तक्र ार अथवा गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नाही़ (प्रतिनिधी)

Web Title: Kipar Gang assaulted by Tipper gang