‘इंटरनेटचा राजा’ स्पर्धेसाठी रंगणार चुरस

By Admin | Updated: September 4, 2014 23:21 IST2014-09-04T23:21:26+5:302014-09-04T23:21:26+5:30

आपला गणोशोत्सव हटके पध्दतीने साजरा करण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो.

The 'King of the Internet' will be playing for the tournament | ‘इंटरनेटचा राजा’ स्पर्धेसाठी रंगणार चुरस

‘इंटरनेटचा राजा’ स्पर्धेसाठी रंगणार चुरस

मुंबई : आपला गणोशोत्सव हटके पध्दतीने साजरा करण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो.  गेल्या तीन वर्षापासून महाराष्ट्रातीलच नव्हे तर देश आणि जगभरातील गणोशभक्तांमध्ये विशेष गाजत असलेल्या स्पर्धेद्वारे आपल्या गणरायाला ‘इंटरनेटचा राजा’ बहुमान मिळवून देण्यासाठी सध्या मोठी चुरस रंगली आहे. 
जगभरातील सर्व गणोशोत्सवाचे दर्शन एकाच ठिकाणी व्हावे या उद्देशाने ¬षभ वसा आणि हमरोश रॉय या तरुणांनी ‘े18ं1ी.ूे’ संकेतस्थळाची निर्मिती केली. 2क्11 साली सुरु झालेल्या या स्पर्धेचे यंदाचे 4थे वर्ष असून आतार्पयत 4क् घरगुती आणि 24 सार्वजनिक गणपतीचे फोटो अपलोड झाले आहेत.
विनामूल्य असलेली ही स्पर्धा घरगुती आणि सार्वजनिक गणपती अशा दोन मुख्य गटात होते. तसेच पर्यावरणाला चालना देण्यासाठी ‘इकोफ्रेंडली गणपती’ असा विशेष पुरस्कारही दिला जातो. ज्या गणपतीला सर्वाधिक व्होट मिळतील त्या गणपतीला ‘इंटरनेटचा राजा’ बहुमान मिळतो. मात्र असे जरी असले तरी मते देताना होणारी चीटींग रोखण्यासाठी स्पर्धेच्या आयोजकांनी नामी शक्कल देखील लढवली आहे.
येथे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी किंवा व्होट करण्यासाठी सर्वप्रथम या संकेतस्थळावर स्वत:चे प्रोफाईल बनवावे लागते. त्यानंतरच आपल्या बाप्पाचे फोटो अपलोड किंवा मतदान करता येते. तसेच स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक प्रोफाईलवरुन प्रत्येक गणपतीला केवळ एकदाच मत देता येते.
गणोशोत्सवात सारेच बाप्पाची सेवा करण्यात गुंतलेले असल्याने काहींना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वेळ मिळणार नाही. यासाठीच आयोजकांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 11 सप्टेंबर रात्री 12 वाजेर्पयत शेवटची वेळ दिली आहे. 
तेव्हा मोठय़ा संख्येने स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.(प्रतिनिधी)
 
असा घ्या सहभाग..
1. सर्वप्रथम े18ं1ी.ूे संकेतस्थळावर स्वत:चे प्रोफाईल बनवा
2. यानंतर आपल्या बाप्पाचे फोटो अपलोड करा.
3. व्होट करा आणि आपल्या हितचिंतकांना देखील वोट करण्यास सांगा.

 

Web Title: The 'King of the Internet' will be playing for the tournament