कुत्र्याच्या हल्ल्यात हरणाचा मृत्यू

By Admin | Updated: July 24, 2016 23:08 IST2016-07-24T23:06:34+5:302016-07-24T23:08:15+5:30

कुत्र्याच्या हल्ल्यात हरणाचा मृत्यू

The killer's death in a dog attack | कुत्र्याच्या हल्ल्यात हरणाचा मृत्यू

कुत्र्याच्या हल्ल्यात हरणाचा मृत्यू

आझादनगर : मालेगाव तालुक्यातील शिरसोंडी शिवारात काल सायंकाळी कुत्रा चावल्याने हरण जखमी झाले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली; परंतु यापूर्वीच हरणाचा मृत्यू झाला होता.
एक दिवसापूर्वीच तालुक्यातील घोडेगाव येथे हरणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
शिरसोंडी शिवारात विश्वनाथ कारभारी पवार यांच्या शेतात एकवर्षीय मादी जातीच्या हरणावर कुत्र्यांनी हल्लाकेला. शेतमालक विश्वनाथ पवार यांनी कुत्र्यांच्या तावडीतून हरणाची सुटका केली. सदर प्रकार नारायण वाघ या वनमजुरांकरवी वनविभागाला कळविण्यात आला. वनपाल ए. जे. पाटील, वनरक्षक शिर्के यांनी वाहनसह धाव घेतली. परंतु तोपर्यंत हरणाचा मृत्यू झाला होता. वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
आज सकाळी लोणवाडे शिवारातील रोपवाटिका येथे पशुवैद्यकीय डॉ. खाटीक यांनी हरणाचे शवविच्छेदन केले. (वार्ताहर)

Web Title: The killer's death in a dog attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.