खासगी बसच्या धडकेत एक ठार
By Admin | Updated: March 10, 2016 23:50 IST2016-03-10T23:41:48+5:302016-03-10T23:50:24+5:30
खासगी बसच्या धडकेत एक ठार

खासगी बसच्या धडकेत एक ठार
सिडको : गरवारे पॉवर हाऊस येथून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला खासगी कंपनीच्या बसने जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
इगतपुरी येथून घरी दुचाकीने अंबड लिंकरोडकडे जात असलेले नगिना पंडित सिपाही (४४, रा. विराटनगर) यांच्या दुचाकीला बसने (एमएच १५ इएफ ०३६४) धडक दिल्याची घटना दुपारच्या सुमारास घडल्याचे उघडकीस आले. जखमी सिपाही यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले. बसचालक अशोक काशीनाथ भागवत यास ताब्यात घेतले आहे. दरम्यान, सिपाही यांनी हेल्मेट परिधान केले असल्याने डोक्याला गंभीर मार लागला नाही; मात्र मणक्यांना जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ. राहुल पाटील यांनी दिली. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे. (वार्ताहर)