शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 00:42 IST

भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत देवरगावच्या दुचाकीस्वाराचा मृत्यू, तर त्याच्या पाठीमागे बसलेला युवक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि़१२) सायंकाळच्या सुमारास सातपूर औद्योगिक वसाहतीतील कामगारनगरजवळील ऋषभ कंपनीसमोर घडली़

नाशिक : भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत देवरगावच्या दुचाकीस्वाराचा मृत्यू, तर त्याच्या पाठीमागे बसलेला युवक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि़१२) सायंकाळच्या सुमारास सातपूर औद्योगिक वसाहतीतील कामगारनगरजवळील ऋषभ कंपनीसमोर घडली़ योगेश कैलास मोंढे (२४, रा़ देवरगाव) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून, रवि पांडुरंग मोंढे (२२, रा़ देवरगाव) हा गंभीर जखमी झाला आहे़गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवरगाव येथील योगेश मोंढे व रवि मोंढे हे सातपूर औद्योगिक वसाहतीतील कंपनीत कामास होते़ शुक्रवारी सायंकाळी कंपनीतून सुटी झाल्यानंतर हे दोघेही दुचाकीने (एमएच १५, जी ३४१६) देवरगावला जात होते़ कामगारनगरमधील ऋषभ कंपनीसमोर मोडासा रोडलाइन्सच्या भरधाव ट्रकने (जीजे ३१, टी २३०७) त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली़ यामध्ये योगेश मोंढेच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर रवि मोंढे हा दूरवर फेकला गेल्याने गंभीर जखमी झाला़ दरम्यान, अपघाताच्या घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला़मयत योगेश मोंढे याचा पाच महिन्यांपूर्वीच विवाह झालेला असून, त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे़ दरम्यान, या अपघाताची गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, जखमी रवि लोखंडेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू