डंपर-मोटारसायकल धडकेत युवक ठार; दोघे गंभीर जखमी

By Admin | Updated: November 26, 2015 23:26 IST2015-11-26T23:25:33+5:302015-11-26T23:26:35+5:30

नांदूरशिंगोटे : नाशिक-पुणे महामार्गावर झाला अपघात

Killed in dump-motorcycle crash; Both are seriously injured | डंपर-मोटारसायकल धडकेत युवक ठार; दोघे गंभीर जखमी

डंपर-मोटारसायकल धडकेत युवक ठार; दोघे गंभीर जखमी

नांदूरशिंगोेटे : नाशिक- पुणे राष्ट्रीय महामार्गावर खडी वाहतूक करणारा डंपर आणि मोटारसायकल यांच्यात समोरासमोर धडक होऊन नांदूर शिंगोटे येथील युवकाचा मृत्यू झाला तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास हॉटेल साईअमृत जवळ हा अपघात झाला.
नांदूरशिंगोटे येथील साईनाथ भाऊसाहेब शेळके (२१), विनोद बाबूराव पठारे (२३) व दत्तू निवृत्ती साळवे (२३) हे तिघे युवक कामानिमित्त मोटारसायकलहून (क्र. एम. एच. १५, ए. टी. ८९१७) संगमनेरच्या दिशेने चालले होते. यावेळी सिन्नरच्या दिशेने येणाऱ्या डंपरने (क्र. एम. एच. १३, आर. ४३६९) नांदूरशिंगोटे बायपास नजीक त्यांना समोरुन जोरदार धडक दिली. अपघातानंतर डंपर चालक फरार झाला आहे.
परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेत गंभीर जखमी झालेल्या तिघाही युवकांना संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्रकृती अधिक खालावल्याने दत्तू साळवे यास गुरुवारी पहाटे नाशिक येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले. साईनाथ शेळके याचा उपचार सुरु असतांना गुरुवारी सकाळी
मृत्यू झाला. विनोद पठारे याच्यावर संगमनेर येथे उपचार सुरु आहेत. (वार्ताहर)

Web Title: Killed in dump-motorcycle crash; Both are seriously injured