कुत्र्यांच्या हल्ल्यात नऊ शेळ्या ठार

By Admin | Updated: May 30, 2017 00:23 IST2017-05-30T00:23:39+5:302017-05-30T00:23:47+5:30

लासलगाव : ब्राह्मणगाव (विंचूर) जोशीवाडा येथे गोरख दुर्वे यांच्या घरामागील गोठ्यात बांधलेल्या सहा शेळ्या व तीन कोकरू कुत्र्यांच्या हल्ल्यात ठार झाले़

Kill nine goats in dogs attack | कुत्र्यांच्या हल्ल्यात नऊ शेळ्या ठार

कुत्र्यांच्या हल्ल्यात नऊ शेळ्या ठार


लोकमत न्यूज नेटवर्क
लासलगाव : ब्राह्मणगाव (विंचूर) जोशीवाडा येथे गोरख दुर्वे यांच्या घरामागील गोठ्यात बांधलेल्या सहा शेळ्या व तीन कोकरू कुत्र्यांच्या हल्ल्यात ठार झाले़ यामुळे गावकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले.
दुर्वे यांनी गेल्या आठवड्यातच काही शेळ्या खरेदी केल्या होत्या. सहा शेळ्या व तीन कोकरू अत्यंत क्रूर पद्धतीने भटक्या कुत्र्यानी मारले
आहे.
गोठ्यात बांधलेल्या त्या सर्व शेळ्या मृतावस्थेत आढळून आल्याने दुर्वे परिवार या प्रकाराने हादरून गेला. सदर घटनेची माहिती लासलगाव पोलीस ठाणे, पशुवैद्यकीय अधिकारी, पोलीसपाटील तसेच वनविभागास व तलाठी यांना माहिती देण्यात आली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वाघ, डॉ. नवले यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून उत्तरीय तपासणी केली. भटक्या कुत्र्याच्या चाव्याने शेळ्यांचा अंत झाल्याचे निष्पन्न झाले.

Web Title: Kill nine goats in dogs attack