उत्तर महाराष्ट्रात प्रथमच बालकाचे किडनी ट्रान्सप्लांट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:15 IST2021-02-13T04:15:37+5:302021-02-13T04:15:37+5:30

नाशिक : येथील अपोलो हॉस्पिटल्समध्ये अवघ्या नऊ वर्षाच्या यशराजचे किडनी प्रत्यारोपण करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. दहा वर्षाखालील लहान ...

Kidney transplant for the first time in North Maharashtra! | उत्तर महाराष्ट्रात प्रथमच बालकाचे किडनी ट्रान्सप्लांट !

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच बालकाचे किडनी ट्रान्सप्लांट !

नाशिक : येथील अपोलो हॉस्पिटल्समध्ये अवघ्या नऊ वर्षाच्या यशराजचे किडनी प्रत्यारोपण करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. दहा वर्षाखालील लहान मुलाचे किडनी प्रत्यारोपण उत्तर महाराष्ट्रात प्रथमच झाले असून शस्त्रक्रियेनंतर गत सहा महिन्यांपासून संबंधित मुलाची तसेच त्याला किडनी दान देणाऱ्या त्याच्या ५७ वर्षाच्या आजीची तब्येत तंदुरुस्त असल्याने किडनी विकार आणि प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. मोहन पटेल यांनी सांगितले.

अवघ्या नऊ वर्षाच्या यशच्या गत दोन वर्षांपासून दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यामुळे त्याचे डायलिसिस सुरू होते; पण त्याच्या रक्तवाहिन्या लहान असल्याने फिशुला करणे शक्य नसल्याने कॅथेटरमधून डायलिसिस सुरू होते. इतक्या कमी वयाच्या रुग्णाचे डायलिसिस सतत चालू ठेवणे हे रुग्णाला त्रासदायक, अडचणीचे आणि धोक्याचे असल्याने किडनी प्रत्यारोपण करणे अत्यावश्यक बनले हाेते. मुलाच्या आई-वडिलांपेक्षा यशच्या आजीची किडनी अधिक चांगल्या प्रकारे मॅच झाल्याने आजीने किडनीदान करीत यशला पुन्हा नवीन जन्म प्राप्त करून दिला. युरोसर्जन डॉ. किशोर वाणी यांनी ‘लहान मुलांवर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी होत नाही हा समाजात गैरसमज असल्याचे सांगितले. मात्र, किडनी प्रत्यारोपण करणाऱ्या सर्जनचा अनुभव, अपोलो हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेले अद्ययावत तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा आणि शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची घेण्यात येणारी काळजी यामुळे हे प्रत्यारोपण यशस्वी झाल्याचे नमूद केले. युरोसर्जन डॉ. प्रवीण गोवर्धने म्हणाले की, लहान मुलांमध्ये रक्तवाहिन्यांचा आणि मूत्राशयाचा आकार वयानुरूप लहान तर प्रौढांमध्ये मोठा असल्याने मूत्रनलिकेच्या मूत्राशयाला दिला जाणारा जोड ही अतिशय क्लिष्ट प्रक्रिया असूनही ते यशस्वी झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी डॉ. प्रसाद मुगळीकर, डॉ. प्रकाश उगले, डॉ, चेतन भंडारे, डॉ, मंगेश जाधव यांनीदेखील या यशामागील टीमवर्कचे महत्त्व विशद केले.

फोटो

१२अपोलो फोटो

(फोटो घ्यायचा की नाही, ते विचारुन घ्यावे)

Web Title: Kidney transplant for the first time in North Maharashtra!