नाशिकरोडला युवकाचे अपहरण; गुन्हा दाखल
By Admin | Updated: May 16, 2017 00:19 IST2017-05-16T00:19:39+5:302017-05-16T00:19:53+5:30
नाशिकरोड : राजश्री लॉटरी सेंटरच्या दुकानचालक युवकास रविवारी रात्री पांढऱ्या रंगाच्या गाडीतून आलेल्या युवकांनी बळजबरीने गाडीत बसवून अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

नाशिकरोडला युवकाचे अपहरण; गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : नाशिकरोड बसस्थानकाजवळील राजश्री लॉटरी सेंटरच्या दुकानचालक युवकास रविवारी रात्री पांढऱ्या रंगाच्या गाडीतून आलेल्या चार-पाच युवकांनी बळजबरीने गाडीत बसवून अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकरोड बसस्थानकाजवळ देवळालीगावातील माजिद अब्दुल लफिक शेख (वय ४१) या युवकाचे राजश्री लॉटरी सेंटर दुकान आहे. रविवारी रात्री ८.३० च्या सुमारास माजिद हा आपला मोठा भाऊ सईद यांच्यासोबत लॉटरी दुकानांत होते. यावेळी पांढऱ्या रंगाच्या गाडीतून आलेल्या अज्ञात चार-पाच जणांनी दुकानात घुसून माजिद याला बळजबरीने गाडीत बसवून घेऊन गेले.
काही मिनिटांतच सदर प्रकार घडला. त्यानंतर सईद शेख यांने नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना घडलेली हकिकत सांगितली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपासून नाशिकरोड परिसरात गुन्हेगारीचे प्रकार वाढले असून, हाणामारी, भुरट्या चोऱ्या वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.