नाशिक : पंडित काॅलनीतील महानगरपालिका पश्चिम कार्यालयाच्या गेटवर रिक्षातून उतरून पायी कार्यालयात जात असताना एका व्यक्तीने बोलावून घेत महिलेला जबरदस्तीने रिक्षातून घेऊन जात अपहरण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठण्यात पीडितेच्या फिर्यादीवरून तीन महिलांसह चार संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला महानगरपालिका कार्यालयाच्या गेटवर रिक्षातून उतरून कार्यालयात जात असताना संशयित सौरभ जाधव (२२) याने तिला आवाज देऊन बोलावून घेत महिलेला त्याच्यासोबत जाण्यासाठी जबरदस्ती केली. न गेल्यास तिच्या भावाला जीवे ठार मारण्याची धमकीही दिली. तसेच एका रिक्षातून बळजबरीने घेऊन जात पीडितेचा मोबाईल, पैसे काढून घेत लग्न करण्यासाठी जबरदस्ती करून मारहाण केली. त्याचप्रमामे पीडितेला शिवीगाळ करून तिच्या इच्छेविरुद्ध रिक्षातून घेऊन गेल्याने संशयित सौरत्र जाधव यासह सुलोचना जाधव, निकिता जाधव व त्यांची मावशी अशा चौघांवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
पंडित कॉलनीतून महिलेचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 00:39 IST