वडाळागावातील अल्पवयीन मुलीचे अपहरण
By Admin | Updated: April 29, 2017 21:15 IST2017-04-29T21:15:17+5:302017-04-29T21:15:17+5:30
मैत्रिणीकडे जाणाऱ्या अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार वडाळागाव परिसरात

वडाळागावातील अल्पवयीन मुलीचे अपहरण
नाशिक : मैत्रिणीकडे जाणाऱ्या अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार वडाळागाव परिसरात मंगळवारी (दि़२५) सकाळच्या सुमारास घडला़ याप्रकरणी अपहृत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़