पंचवटीतील अल्पवयीन मुलीचे अपहरण
By Admin | Updated: April 3, 2017 13:51 IST2017-04-03T13:51:16+5:302017-04-03T13:51:16+5:30
पंचवटी परिसरातील गणेशवाडी येथील एका सोळा वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना

पंचवटीतील अल्पवयीन मुलीचे अपहरण
नाशिक : पंचवटी परिसरातील गणेशवाडी येथील एका सोळा वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना रविवारी (दि़२) घडली़ देवी मंदिर चौक परिसरात राहणाऱ्या या अल्पवयीन मुलीस दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद अपहृत मुलीच्या काकाने पंचवटी पोलीस ठाण्यात दिली आहे़ या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़